भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पावसानं खोडा घातला आहे. नाणेफेकीचा कौल टीम इंडियाच्या बाजूनं लागला आणि विराट कोहलीनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यानंतर पावसानं एन्ट्री मारली आणि सामना सुरू होण्यास विलंब झाला. पावसाच्या दमदार एन्ट्रीनं चाहते निराश झालेले पाहायला मिळाले. त्याचवेळी मुंबई इंडियन्सही प्रचंड दुखी झाला. त्यांनी पाऊस जाण्यासाठी गाणं पोस्ट केलं. त्यात जसप्रीत बुमराहच्या नावाचा उल्लेख करून ती आणखी मजेशीर बनवली.
2020 या वर्षातील पहिल्याच सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली होती. या मालिकेतून जसप्रीत बुमराह आणि शिखर धवन पुनरागमन करणार होते. बुमराहच्या पुनरागमनाकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. कारण, दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी बुमराहनं दुखापतीमुळे माघार घेतली होती. त्यानंतर तब्बत तीन महिन्यांनी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. पण, पावसानं खोडा घातल्यानं सर्व निराश झाले. मुंबई इंडियन्सने तर चक्क गाण्यातून पावसाला जाण्याची विनंती केली.
Rain, rain go away, Come again another day, Boom Boom Bumrah wants to play, Rain, rain go away ☹️
टीम इंडिया XI - शिखर धवन, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी
IND vs SL : विराट कोहलीला चाहत्याचं अनोखं गिफ्ट; जुन्या मोबाईलपासून बनवलं खास चित्र
IND vs SL : चौकार, षटकाराचे पोस्टर Not Allow; बीसीसीआयचा निर्णय, जाणून घ्या कारण...