भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातला पहिला ट्वेंटी-20 सामना काही वेळातच सुरु होईल. 2020 वर्षातील टीम इंडियाच्या पहिल्याच सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. या सामन्यात चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळेल, अशी सर्वांनाच अपेक्षा आहे. पण, स्टेडियममधील चाहत्यांना या आतषबाजीचा मनमुराद आनंद साजरा करता येणार नाही. कारण, या सामन्यात गुवाहाटीच्या बर्सापरा स्टेडियमवर चौकार - षटकाराचे पोस्टर आणण्यास चाहत्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
OMG : विराट कोहलीला दुखापत; पहिल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाची चिंता वाढली
गुवाहाटी येथे सध्या नागरिकत्व सुधारक कायद्याच्या निषेधार्थ आसाममध्ये निदर्शनं होत आहेत आणि त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे चौकार-षटकारांच्या पोस्टर्ससह अन्य कोणतेही पोस्टर स्टेडियमवर चाहत्यांना घेऊन जाता येणार नाही. आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव देवाजीत सैकिया यांनी सांगितले की,''हा आंतरराष्ट्रीय सामना आहे. त्यामुळे सुरक्षेची पुरेपूर काळजी आम्ही घेत आहोत. त्यामुळे स्टेडियमवर कोणतेही पोस्टर किंवा मार्कर पेन घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.''
IND vs SL : विराट कोहलीला चाहत्याचं अनोखं गिफ्ट; जुन्या मोबाईलपासून बनवलं खास चित्र
टीम इंडिया - विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन
श्रीलंका - लसिथ मलिंगा ( कर्णधार), दानुष गुणथिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, कुसल पेरेरा, निरोशान डिकवेला, धनंजया डी सिल्वा, इसुरू उदाना, भानुका राजपक्ष, ओशाडा फर्नांडो, वनिंदू हसरंगा, लाहीरु कुमारा, कुसल मेंडीस, लक्षण संदाकन, कसून रजिथा.