गाले : कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर अभिनव मुकंद यांच्या अर्धशतकी तडाख्यामुळे भारताने ४९८ धावांची एकूण आघाडी घेत पहिल्या
कसोटीच्या तिसºयाच दिवशी श्रीलंकेवर वर्चस्व मिळविले आहे. खेळ संपला त्यावेळी दुसºया डावात भारताच्या ३ बाद १८९ धावा होत्या. त्याआधी ६०० धावांचा पाठलाग करणाºया लंकेचा पहिला डाव २९१ धावांत आटोपताच ३०९ धावांची आघाडी मिळाली होती. पहिल्या डावांत लवकर बाद
झालेल्या कोहलीने नाबाद ७६ आणि मुकंदने ८१ धावांचे योगदान दिले. कसोटीतील सवाच्चर््े ा धावा काढणारा मकु ुं द दिवसाच्या अखरे च्या षटकात्ं ा पायचित झाला. या दोघांनी तिसºया गड्यासाठी १३३ धावांची भागीदारी केली.
त्यापूर्वी भारतीय गोलंदाजांपुढे श्रीलंकेचे फलंदाज फार काही तग धरू शकले नाहीत. रवींद्र जडेजाने उपहारानंतर लगेच लाहिरु कुमाराला
बाद करीत लंकेचा पहिला डाव संपुष्टात आणला. दिलरुवान परेरा सर्वाधिक ९२ धावांवर नाबाद राहिला. त्यान े १३२ चडें ू टोलवन्ू ा दहा चाकै ार
आणि सहा षट्कार खेचले. अँजेला मॅथ्यूजनेदेखील ८३ धावांचे भरीव योगदान दिले. श्रीलंकेला फॉलोआॅन न देता दुसºया डावात परत फलंदाजी
करण्याचा निर्णय घेणाºया भारताची सुरुवात अडखळत झाली. पहिल्या डावात १९० धावांची शतकी खेळी करणारा शिखर धवन माघारी परतला.
दिलरु वान परेराने एक मोठा अडसर दूर केला आहे. त्यानंतर काही मिनिटांतच लिहरु कुमाराने चेतेश्वर पुजाराला बाद करीत आणखी एक धक्का दिला.
चहापानाच्या ४० मिनिटे आधी पाऊस सुरू झाला. कोहली-मुकुंद यांनी चहापानानंतर खेळाची सूत्रे स्वत:कडे घेतली. मुकुंदने सातव्या कसोटीत दुसरे अर्धशतक पूर्ण केले. कोहलीनेदेखील मागील आठ डावांत पहिल्यांदा अर्धशतक ठोकले. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ लांबणार
अशी चिन्हे असतानाच मकु ुं द पायचित झाला. डावखुºया मुकुंदने रेफ्रल मागितले पण त्याचा त्याला लाभ झाला नाही. मुकुंद बाद होताच
पंचांनी तिसºया दिवसाचा खेळ संपल्याची घोषणा केली.
गेल्या ७८ वर्षांत लक्ष्याचा पाठलाग करताना कुठल्याही संघाने चौथ्या डावांत ४५१ पेक्षा अधिक धावा केलेल्या नाहीत. कर्णधार म्हणून कोहलीने विदेशात सर्वांत कमी १७ डावांत एक हजार धावा काढण्याचा भारतीय विक्रम नोंदविला. हार्दिक पांड्याने पहिल्या डावात नुवान प्रदीपची दांडी गूल करीत
कसोटीतील पहिल्या बळीची नोंद केली.
धावपालक -
भारत पहिला डाव : ६०० धावा.
श्रीलंका पहिला डाव : दिमुथ करुणारत्ने
पायचित गो. उमेश यादव २, उपुल थरंगा
धावबाद ६४, धनुष्का गुणतिलका झे. धवन गो.
शमी १६, कुशाल मेंडिस झे.धवन गो. शमी ००,
अंज्ँ ोलो मॅथ्यूज झे.कोहली गो. जडेजा ८३,
निरोशन डिकवेला झे. मुकुंद गो. अश्विन
८,दिलरुवान परेरा नाबाद ९२, रंगना हेरथ झे.
रहाणे गो. जडेजा ९, नुवान प्रदीप त्रि. गो. पांड्या
१०, लाहिरू कुमारा त्रि. गो. जडेजा २, असेला
गुणरत्ने निवृत्त. अवांतर ५,
एकूण ७८.३ षटकांत सर्वबाद २९१ धावा.
गडी बाद क्रम : १/७, २/६८, ३/६८, ४/१२५,
५/१४३, ६/२०५,७/२४१,८/२८०,९/२९१,
गोलंदाजी : मोहम्मद शमी १२-२-४५-२, उमेश
यादव १४-१-७८-१, रवीचंद्रन अश्विन २७-४८४-
१, रवींद्र जडेजा २२.३-३-६७-३, हार्दिक
पांड्या ३-०-१३-१.
भारत दुसरा डाव :
शिखर धवन झे.
गुणतिलका गो. परेरा
१४, अभिनव मुकंद
पायचित गो. गुणतिलका
८१, चेतेश्वर पुजारा झे.
मंेि डस गो. कु मारा १५,
विराट कोहली खेळत
आहे ७६, अवांतर ३,
एकूण: ४६.३ षटकांत ३
बाद १८९ धावा. गडी
बाद क्रम : १/१९,
२/५६, ३/१८९.
गोलंदाजी : नुवान प्रदीप
१०-२-४४-०, परेरा
१२-०-४२-१, कुमारा
११-१-५३-१, हेरथ ९०-
३४-०, गुणतिलका
४.३-०-१५-१.धाव्धावफलकधावफलकाफलक
Web Title: India vs Sri Lanka, 1st Test inda lead
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.