India vs Sri Lanka 2nd Test, Pink Ball Test : भारतीय संघाने रविवारी श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी १ डाव व २२२ धावांनी जिंकली. रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने हा दणदणीत विजय मिळवला. भारताच्या ८ बाद ५७४ धावांच्या प्रत्युत्तरात श्रीलंकेने पहिल्या डावात १७४ आणि दुसऱ्या डावात १७८ धावाच केल्या. नाबाद १७५ धावां आणि दोन्ही डावांत मिळून ( ५-४१ व ४-४६) ९ विकेट्स घेणाऱ्या जडेजाला मॅन ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले. आता India vs Sri Lanka Pink Ball Test १२ मार्चपासून सुरू होत आहे. पण, तत्पूर्वी भारतीय संघात बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
भारतीय संघ व्यवस्थापनाने कुलदीप यादवला ( Kuldeep Yadav ) कसोटी संघातून रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. अष्टपैलू अक्षर पटेल ( Axar Patel) हा दुखापतीतून सावरला आहे आणि त्याच्यासाठी कुलदीपला रिलीज केले जाणार असल्याचे वृत्त Cricbuzz ने दिले आहे. मोहाली कसोटी सुरू असतानाच अक्षर पटेल भारताच्या ताफ्यात दाखल झाला होता. २८ वर्षीय अक्षर पटेलच्या जागी बॅक अप म्हणून २७ वर्षीय कुलदीपचा समावेश करण्यात आलेला नव्हता. संघ व्यवस्थापनाला तीन डावखुरे फिरकीपटू नको होते. भारताच्या १८सदस्यीय संघात रवींद्र जडेजा, आर अश्विन व जयंत यादव हे तीन फिरकीपटू आहेत.
BCCI ने २२ फेब्रुवारीला या मालिकेसाठी संघ जाहीर केला. त्यावेळी त्यांनी अक्षर पटेला हा दुखापतीतून सावरत आहे आणि त्यामुळे तो पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध नसेल हे स्पष्ट केले होते. दुसऱ्या कसोटीपूर्वी त्याच्या तंदुरुस्तीच्या चाचणीनंतर निर्णय घेतला जाईल, असेही सांगितले होते. डिसेंबरमध्ये न्यूझीलंविरुद्ध मुंबईत झालेल्या कसोटीपासून अक्षर संघाबाहेर आहे. तो आता बंगळुरू कसोटीसाठी उपलब्ध आहे. १२ मार्चपासून या कसोटीला सुरूवात होणार आहे.
भारतीय संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), प्रियांक पांचाळ, मयांक अग्रवाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुबमन गिल, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), केएस भरत, रवींद्र जडेजा, जयंत यादव, आर अश्विन, अक्षर पटेल, सौरभ कुमार, मोहम्मद सिराज, उमेश यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार).