भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात जसप्रीत बुमराहनं पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर दानुष्का गुणथिलकाला बाद करून एक विक्रम नावावर केला.
नाणेफेक जिंकून श्रीलंकेनं यजमानांना प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. शिखर धवन ( 52) आणि लोकेश राहुल ( 54) यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करुन दिली. धवन आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. पण, आघाडीवर खेळण्याची संधी मिळालेल्या संजू सॅमसन, श्रेयस अय्यर यांनी निराश केले. कर्णधार विराट कोहलीनं ( 26) सहाव्या क्रमांकावर येताना संघाचा डाव सावरला. त्याला मनीष पांडेची ( 31*) चांगली साथ मिळली आणि टीम इंडियानं मोठी धावसंख्या उभारली. भारतानं अखेरच्या 4 षटकांत 59 धावा चोपून काढल्या. शार्दूल ठाकूरनं 8 चेंडूंत नाबाद 22 धावा करून संघाला दोनशे धावांचा पल्ला पार करून दिला. भारतानं 20 षटकांत 6 बाद 201 धावा करून लंकेसमोर विजयासाठी 202 धावांचे लक्ष्य ठेवले.
लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेला पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर जसप्रीत बुमराहनं धक्का दिला. बुमराहनं लंकेच्या दानुष्का गुणथिलकाला (1) वॉशिंग्टन सुंदरकरवी झेलबाद केले. या विकेटसह बुमराहनं आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये विक्रमाला गवसणी घातली. टीम इंडियाकडून ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक ( 53) विकेट घेण्याचा पराक्रम बुमराहनं नावावर केला. त्यानं आर अश्विन ( 52) आणि युजवेंद्र चहल ( 52) यांचा विक्रम मोडला. बुमराहनं 45 सामन्यांत 53 विकेट्स घेतल्या.
India vs Sri Lanka, 3rd T20I : विराटच्या नावावर लाखमोलाचा विक्रम, ठरला जगातला पहिला फलंदाज
विराट कोहलीचा World Record; पहिली धाव अन् कर्णधारांमध्ये पटकावलं मानाचं स्थान
India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल
India vs Sri Lanka, 3rd T20I : पुण्याचा इतिहास जाणून श्रीलंकेनं संधी साधली अन्...
India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार