भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 97 धावांची भागीदारी करताना संघाला दमदार सुरुवात करुन दिली. धवन आणि राहुल यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले. पण, आघाडीवर खेळण्याची संधी मिळालेल्या संजू सॅमसन, श्रेयस अय्यर यांनी निराश केले. पण, कर्णधार विराट कोहलीनं सहाव्या क्रमांकावर येताना संघाचा डाव सावरला. त्याला मनीष पांडेची चांगली साथ मिळली आणि टीम इंडियानं समाधानकारक धावा उभ्या केल्या. कोहलीनं या सामन्यात ट्वेंटी-20त कोणालाच न जमलेला विक्रम नावावर केला.
पाहुण्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियानं या महत्त्वाच्या सामन्यात संजू सॅमसन, युजवेंद्र चहल आणि मनीष पांडे यांना संधी दिली आहे. आजच्या सामन्यात कुलदीप यादव, रिषभ पंत आणि शिवम दुबे यांना विश्रांती दिली. पहिला पॉवर प्ले टीम इंडियाच्या बाजूनं राहिला. दुसऱ्याच षटकात मिळालेल्या जीवदानानंतर शिखर धवननं सावध खेळ केला. पण, दुसऱ्या बाजूनं लोकेश राहुलनं फटकेबाजी केली. खेळपट्टीवर स्थिरस्थावर झाल्यानंतर धवनही रंगात आला. त्यानेही श्रीलंकेच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. या दोघांनी पहिल्या पॉवरप्लेमध्ये टीम इंडियासाठी 63 धावा जोडल्या.
विराट कोहलीचा World Record; पहिली धाव अन् कर्णधारांमध्ये पटकावलं मानाचं स्थान
India vs Sri Lanka, 3rd T20I : अंतिम सामन्यात टीम इंडियानं संघात केले तीन महत्त्वपूर्ण बदल
India vs Sri Lanka, 3rd T20I : पुण्याचा इतिहास जाणून श्रीलंकेनं संधी साधली अन्...
India vs Sri Lanka, 3rd T20I : अखेर 1637 दिवसांनी 'हा' खेळाडू टीम इंडियाकडून खेळणार