India vs Sri Lanka : टीम इंडियाचा सामना करण्यासाठी श्रीलंकेचा तगडा संघ जाहीर; दिग्गज खेळाडूचे पुनरागमन

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2020 09:20 AM2020-01-02T09:20:57+5:302020-01-02T09:21:31+5:30

whatsapp join usJoin us
India vs Sri Lanka : Angelo Mathews gets T20I recall, part of Sri Lanka squad for India series | India vs Sri Lanka : टीम इंडियाचा सामना करण्यासाठी श्रीलंकेचा तगडा संघ जाहीर; दिग्गज खेळाडूचे पुनरागमन

India vs Sri Lanka : टीम इंडियाचा सामना करण्यासाठी श्रीलंकेचा तगडा संघ जाहीर; दिग्गज खेळाडूचे पुनरागमन

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 2020 या नव्या वर्षातील दोन्ही संघांची ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी तगड्या खेळाडूंची फौज मैदानावर उतरवली आहे. टीम इंडियानं या दौऱ्यासाठी आधीच संघ जाहीर केला होता. त्यांना टक्कर देण्यासाठी श्रीलंकेनं बुधवारी संघ जाहीर केला. 16 सदस्यांच्या या संघात लंकेनं अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला संघात पुन्हा स्थान दिले आहे. दुखापतीमुळे ऑगस्ट 2018नंतर मॅथ्यूज लंकेच्या ट्वेंटी-20 संघात खेळलेला नाही. लसिथ मलिंगा या संघाचे नेतृत्व करणार आहे. 

श्रीलंकेचा संघ - लसिथ मलिंगा ( कर्णधार), दानुष गुणथिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, कुसल पेरेरा, निरोशान डिकवेला, धनंजया डी सिल्वा, इसुरू उदाना, भानुका राजपक्ष, ओशाडा फर्नांडो, वनिंदू हसरंगा, लाहीरु कुमारा, कुसल मेंडीस, लक्षण संदाकन, कसून रजिथा. 


वेळापत्रक
5 जानेवरी, भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला टी20 सामना(गुवाहाटी)
7 जानेवरी, भारत  विरुद्ध  श्रीलंका, दूसरा टी20 सामना(इंदूर)
9 जानेवरी, भारत  विरुद्ध श्रीलंका, तिसरा टी20 सामना (पुणे)

टीम इंडिया - विराट कोहली, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, मनिष पांडे, वॉशिंग्टन सुंदर, संजू सॅमसन

Web Title: India vs Sri Lanka : Angelo Mathews gets T20I recall, part of Sri Lanka squad for India series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.