भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातल्या ट्वेंटी-20 मालिकेला 5 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. 2020 या नव्या वर्षातील दोन्ही संघांची ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे दोन्ही संघांनी तगड्या खेळाडूंची फौज मैदानावर उतरवली आहे. टीम इंडियानं या दौऱ्यासाठी आधीच संघ जाहीर केला होता. त्यांना टक्कर देण्यासाठी श्रीलंकेनं बुधवारी संघ जाहीर केला. 16 सदस्यांच्या या संघात लंकेनं अनुभवी अँजेलो मॅथ्यूजला संघात पुन्हा स्थान दिले आहे. दुखापतीमुळे ऑगस्ट 2018नंतर मॅथ्यूज लंकेच्या ट्वेंटी-20 संघात खेळलेला नाही. लसिथ मलिंगा या संघाचे नेतृत्व करणार आहे.
श्रीलंकेचा संघ - लसिथ मलिंगा ( कर्णधार), दानुष गुणथिलका, अविष्का फर्नांडो, अँजेलो मॅथ्यूज, दासून शनाका, कुसल पेरेरा, निरोशान डिकवेला, धनंजया डी सिल्वा, इसुरू उदाना, भानुका राजपक्ष, ओशाडा फर्नांडो, वनिंदू हसरंगा, लाहीरु कुमारा, कुसल मेंडीस, लक्षण संदाकन, कसून रजिथा.