लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिलाच सामना खेळणाऱ्या रवींद्र जडेजाने पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिले. त्याने कुशल मेंडिसला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले. विशेष म्हणजे रवींद्र जडेजाने ही विकेट घेतली त्यावेळी कॉमेंट्री बॉक्समध्ये संजय मांजरेकर समालोचन करत होता. मांजरेकर आणि जडेजा यांच्यात सोशल मीडियावर शीतयुद्ध रंगले होते आणि आजच्या प्रसंगानंतर नेटिझन्सने मांजरेकरला चांगलेच ट्रोल केले.
भारताला इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर मांजरेकर यांनी लोकेश राहुल, महेंद्रसिंग धोनी आणि रवींद्र जडेजा यांच्यावर टीका केली होती. जडेजावर टीका करताना मांजरेकर म्हणाले होते की, " जडेजा हा कसोटी क्रिकेटमध्ये फक्त गोलंदाज आहे, तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये तो फार महत्वाचा खेळाडू नाही." मांजरेकर यांच्या टीकेला जडेजाने सडेतोड उत्तर दिले आहे. यावर जडेजा मांजरेकर यांना म्हणाला की, " मी तुमच्यापेक्षा दुप्पट सामने खेळलो आहे आणि मी अजूनही खेळत आहे. लोकांचा आदर करायला तुम्ही शिकायला हवे."
पण, मांजरेकरच्या याच टीकेचा आज नेटिझन्सनी समाचार घेतला. पाहा हे भन्नाट मीम्स..
जसप्रीत बुमराहचा विक्रम, सर्वात जलद बळींचे शतक करणारा दुसरा भारतीयभारतीय संघातील सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहनं शनिवारी विक्रमाला गवसणी घातली. वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात श्रीलंकेविरुद्ध त्याने हा विक्रम नोंदवला. डावाच्या चौथ्या षटकात श्रीलंकेला पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमरानहे श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला (10) यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले. वन डे क्रिकेटमधील बुमराहचा हा शंभरावा बळी ठरला. भारताकडून सर्वात बळींचे शतक साजरे करणारा तो दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे. त्याने 57व्या सामन्यात ही कामगिरी केली.
भारताकडून सर्वाद जलद 100 विकेट घेण्याचा विक्रम मोहम्मद शमीच्या नावावर आहे. त्याने 56 सामन्यांत हा पराक्रम केला आहे. त्यापाठोपाठ इरफान पठाण ( 59 सामने) , झहीर खान ( 65 सामने ), अजित आगरकर ( 67 सामने ) आणि जवागल श्रीनाथ ( 68 सामने) यांचा क्रमांक येतो. बुमराह या क्रमवारीत दुसरा येतो.