India Vs Sri Lanka, Latest News : पंतच्या खांद्यावर आहे कोणाचा हात, ओळखून दाखवा...

यावेळी महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, जसप्रीत बुमरा आणि मयांक अगरवाल दिसत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2019 06:13 PM2019-07-06T18:13:39+5:302019-07-06T18:14:37+5:30

whatsapp join usJoin us
India Vs Sri Lanka, Latest News: Identify whose hand is on Pant's shoulder ... | India Vs Sri Lanka, Latest News : पंतच्या खांद्यावर आहे कोणाचा हात, ओळखून दाखवा...

India Vs Sri Lanka, Latest News : पंतच्या खांद्यावर आहे कोणाचा हात, ओळखून दाखवा...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : श्रीलंकेच्या सामन्यापूर्वी भारतीय संघाने इंग्लंडमध्ये चांगलीच भटकंती केली. यावेळी महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या, रिषभ पंत, जसप्रीत बुमरा आणि मयांक अगरवाल दिसत आहेत. या फोटोमध्ये पंतच्या खांद्यावर एका खेळाडूने हात ठेवला आहे. हा खेळाडू नेमका कोण आहे, ते तुम्ही ओळखून दाखवा.

पाहा हे ट्विट


या फोटोमध्ये पंतच्या खांद्यावर कोणाचा हात आहे, हे तुम्हाला अजूनही समजले नसेल. तुम्हाला जर सांगता येत नसेल, तर आम्ही सांगतो. पंतच्या खांद्यावर यावेळी हात ठेवला आहे तो केदार जाधवने. पण उंची कमी असल्यामुळे जाधव या फोटोमध्ये दिसत नाही.


भारताच्या चारही विकेट्मध्ये धोनीचाच हात, संघासाठी ठरतोय बोनस
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने आपले पहिले चार फलंदाज ५५ धावांत गमावले. पण या चारही भारताच्या यशामध्ये धोनीचाच हात असल्याचे समोर आले आहे. धोनीवर आतापर्यंत विश्वचषकात बरीच टीका झाली, पण त्याचे मार्गदर्शन संघासाठी बोनस ठरत आहे.

श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांना यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने बाद केले. पण या दोन्ही फलंदाजांचे झेल धोनीनेच पकडले. त्यानंतर श्रीलंकेला तिसरा धक्का रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बसला. यावेळी कुशल परेराचा झेलही धोनीनेच टीपला. गेल्या सामन्यातील शतकवीर अविष्का फर्नांडो हा श्रीलंकेचा चौथा फलंदाज यावेळी बाद झाला. हार्दिक पंड्याने अविष्काला आपल्या गोलंदाजीवर बाद केले. पण यावेळी अविष्काचा झेल पकडला तो धोनीनेच. त्यामुळे आतापर्यंतच्या चारही विकेट्समध्ये धोनीचाच हात असल्याचे पाहायला मिळाले.

वर्ल्ड कपनंतर 'हे' दोन सदस्य टीम इंडियाची साथ सोडणार, कारण?
भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी वर्ल्ड कपनंतर संघासोबत नव्यानं करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कल्पना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही दिली आहे. बीसीसीआयनं करारात वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता, परंतु दोघांनीही तो अमान्य केल्याचे, वृत्त आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''फिटनेस ट्रेनर म्हणून यापुढे संघासोबत काम न करण्याचे बसु यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यांना विश्रांतीची आवश्यकता आहे. पॅट्रीक यांनीही हिच भूमिका घेतली आहे. वर्ल्ड कप आणि वेस्ट इंडिज मालिकेनंतर त्यांच्या रिप्लेसमेंटचा विचार केला जाईल.''

भारतीय खेळाडूंच्या तंदुरूस्तीचा स्तर उंचावण्यामागे या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. शंकर बसु यांनीच यो-यो टेस्ट अनिवार्य केले होते. विराट कोहलीच्या फिटनेसचे श्रेय बसु यांनाच जाते आणि कोहलीनंही ते कबुल केले आहे. कोहली म्हणाला होता की,'' मैदानावरील माझी ऊर्जा आणि शारीरिक परिवर्तनामागे बसु आहेत. त्यांनी मला फिटनेस संदर्भात बरेच काही शिकवलं.'' 

Web Title: India Vs Sri Lanka, Latest News: Identify whose hand is on Pant's shoulder ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.