लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारताने २६४ धावांचा यशस्वी पाठलाग करून शनिवारी श्रीलंकेवर विजय नोंदवला. विश्वचषक स्पर्धेत भारताचा हा चौथ्या क्रमांकाच्या मोठ्या धावसंख्येचा यशस्वी पाठलाग ठरला. यासंदर्भातला विश्वचषक विक्रम आयर्लंडच्या नावावर आहे. त्यांनी २०११ च्या स्पर्धेत इंग्लंडविरुध्द पाठलाग करुन सामना जिंकताना ३२९ धावा केल्या. भारताचे विश्वचषकातील पहिले पाच यशस्वी पाठलाग पुढीलप्रमाणे-
धावा विरुध्द वर्ष
४/२८८ इंग्लंड २०१५
४/२७७ झिम्बाब्वे २०११
४/२७६ पाकिस्तान २००३
३/२६५ श्रीलंका २०१९
५/२६१ ऑस्ट्रेलिया २०११
रोहितची विश्वचषकातली सहा शतके, पाहा फक्त एका क्लिकवर
आतापर्यंत रोहित शर्माने विश्वचषकात सहा शतके झळकावली आहे. आतापर्यंत कोणत्याही फलंदाजाला विश्वचषकात यापेक्षा जस्त शतके लगावता आलेली नाही. रोहितने एकूण विश्वचषकात सहा शतके लगावत भाराचा महान फलंदाज सचिन तेंडुलकरच्या सहा शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. पण रोहितची ही सहा शतके फक्त एका क्लिकवर तुम्हा पाहू शकता...
विश्वचषकात विराट झाला हजारी मनसबदार
एक हजार धावा करणारा तिसरा भारतीय फलंदाज विराट कोहली याने विश्वचषक क्रिकेटमध्ये एकहजार धावा पुर्ण करण्याचा विक्रम केला आहे. श्रीलंकेविरोधातील सामन्यात त्याने विश्वचषकातील आपल्या १ हजार धावा पुर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो विश्व क्रिकेटमधील
विसावा आणि तिसरा भारतीय फलंदाज ठरला. त्याच्या आधी ही कामगिरी सचिन तेंडुलकर (२२७८ धावा) आणि सौरव गांगुली (१००६ धावा) यांनी केली होती. विराटने २५ डावात खेळताना १०२९ धावा केल्या. सचिन याने ४५ सामन्यात ४४ डावात खेळताना दोन हजारापेक्षा जास्त धावा केल्या होत्या. सचिन तेंडुलकरने १९९२ ते २०११ या कालावधीत झालेल्या सहा विश्वचषक स्पर्धांमध्ये खेळताना सहा शतके आणि १५ अर्धशतके झळकावली होती. तर माजी कर्णधार सौरव गांगुली याने २१ विश्वचषक सामन्यातून खेळताना ही कामगिरी केली. गांगुलीने विश्वचषकात चार शतके आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.
एक हजारपेक्षा जास्त धावा करणारे अव्वल दहा फलंदाज
खेळाडू धावा
रिकी पॉटिंग १७४३
कुमार संगकारा १५३२
ब्रायन लारा १२२५
ए.बी. डिव्हिलियर्स १२०७
ख्रिस गेल ११८६
सनथ जयसुर्या ११६५
जॅक कॅलीस ११४८
शाकीब अल हसन ११४६
तिलकरत्ने दिलशान १११२
लंकादहन; विजयासह भारताचा अव्वल स्थानी विराजमान
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांच्या शतकांच्या जोरावर भारताने श्रीलंकेवर विजय मिळवला. आपल्या अखेरच्या साखळी सामन्यात विजय मिळवत भारतीय संघ अव्वल स्थानावर विराजमान झाला आहे. पण भारत हे अव्वल स्थान कायम राखणार का, हे ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामन्यानंतर समजू शकणार आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया पराभूत झाली तर भारताला अव्वल स्थान कायम राखता येईल आणि त्यांना उपांत्य फेरीत न्यूझीलंडशी सामना करावा लागेल. पण जर ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तर भारताला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागेल आणि त्यांचा उपांत्य फेरीत सामना इंग्लंडशी होईल.
श्रीलंकेच्या २६५ धावांच्या आव्हाना पाठलाग करताना रोहित आणि राहुल यांनी दमदार १८९ धावांची सलामी दिली. रोहितने या शतकासह एका विश्वचषकात पाच शतके लगावण्याचा इतिहास रचला, त्याचबरोबर या विश्वचषकात सर्वाधिक धावांच्या यादीमध्ये अव्वल स्थानही पटकावले. रोहितने १४ चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर १०३ धावा केल्या. राहुलचे हे विश्वचषकातील पहिले शतक ठरले. राहुलने ११ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर १११ धावा केल्या.
अँजेलो मॅथ्यूजचे शतक आणि लहिरू थिरीमानेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेला प्रथम फलंदाजी करताना 264 धावांपर्यंत मजल मारता आली. मॅथ्यूजने यावेळी ११३ धावांची खेळी साकारली, तर थिरीमानेने ५३ धावांची खेळी साकारत त्याला चांगली साथ दिली. भारताकडून जसप्रीत बुमराने यावेळी सर्वाधिक तीन बळी मिळवले.
श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण त्यांचा हा निर्णय योग्य नसल्याचे पहिल्या काही षटकांत समोर आले. कारण श्रीलंकेला आपले चार फलंदाज फक्त ५५ धावांमध्ये गमवावे लागले. पण त्यानंतर मात्र अँजेलो मॅथ्यूज आणि लहिुरु थिरीमाने यांनी शतकी भागीदारी रचली आणि संघाला स्थैर्य मिळवून दिले. मॅथ्यूजने या सामन्यात शतक झळकावले, पण थिरीमानेला मात्र अर्धशतकावरच समाधान मानावे लागले. थिरीमानेने चार चौकारांच्या जोरावर ५३ धावांची खेळी साकारली.
भारताच्या चारही विकेट्मध्ये धोनीचाच हात, संघासाठी ठरतोय बोनस
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना सध्या सुरु आहे. या सामन्यात श्रीलंकेने आपले पहिले चार फलंदाज ५५ धावांत गमावले. पण या चारही भारताच्या यशामध्ये धोनीचाच हात असल्याचे समोर आले आहे. धोनीवर आतापर्यंत विश्वचषकात बरीच टीका झाली, पण त्याचे मार्गदर्शन संघासाठी बोनस ठरत आहे.
श्रीलंकेच्या दोन्ही सलामीवीरांना यावेळी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने बाद केले. पण या दोन्ही फलंदाजांचे झेल धोनीनेच पकडले. त्यानंतर श्रीलंकेला तिसरा धक्का रवींद्र जडेजाच्या गोलंदाजीवर बसला. यावेळी कुशल परेराचा झेलही धोनीनेच टीपला. गेल्या सामन्यातील शतकवीर अविष्का फर्नांडो हा श्रीलंकेचा चौथा फलंदाज यावेळी बाद झाला. हार्दिक पंड्याने अविष्काला आपल्या गोलंदाजीवर बाद केले. पण यावेळी अविष्काचा झेल पकडला तो धोनीनेच. त्यामुळे आतापर्यंतच्या चारही विकेट्समध्ये धोनीचाच हात असल्याचे पाहायला मिळाले.
रोहित शर्माने घडवला विश्वचषकात इतिहास
विश्वचषकात पाचवे ऐतिहासिक शतक रचले ते भारताचा सलामीवीर रोहित शर्माने. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात रोहितने दमदार शतक झळकावले. रोहितचे हे या विश्वचषकातील पाचवे शतक ठरले. विश्वचषकात पाच शतक झळकावणारा रोहित हा पहिलाच फलंदाज ठरला आहे. रोहितने यावेळी श्रीलंकेच्या कुमार संगकाराचा विश्वविक्रम मोडीत काढला आहे. संगकाराने २०१५च्या विश्वचषकात चार शतके लगावली होती.
Web Title: India vs Sri Lanka, Latest News: India's fourth-largest successful chase
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.