लीड्स, आयसीसीवर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ सध्याच्या विश्वचषकात भन्नाट फॉर्मात आहे. कारण भारतीय संघ या विश्वचषकात पहिल्या क्रमांकावरही पोहोचू शकतो. आज भारत आणि श्रीलंकेचा सामना सुरु आहे. हा सामाना सुरु असताना एक अशी गोष्ट घडली की, त्यामुळे भारतीय संघाची सुरक्षा धोक्यात असल्याचे म्हटले जात आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना सुरु असताना एक विमान मैदानावरून गेले. या विमानावर ' जस्टीस फॉर काश्मीर' असे लिहिण्यात आले होते. या सामन्यात दुसऱ्यांगा एक हेलिकॉप्टर गेले आणि त्यावर 'इंडिया स्टॉप गेनोसाईड अँड फ्री कश्मीर' म्हणजेच ' भारताने काश्मीरमधील नरसंहार थांबवावा आणि ते मुक्त करावे' अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता.
हे नेमके घडले तरी कधीश्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताचे चौथे षटक जसप्रीत बुमरा टाकत होता. त्यामुळे मैगानावरून पहिल्यांदा एक विमान गेले त्यावर ' जस्टीस फॉर काश्मीर' असे लिहिण्यात आले होते. त्यानंतर सामन्याच्या १७व्या षटकातहीअशीच एक घटना घडली. यावेळी एक हेलिकॉप्टर गेले आणि त्यावर 'इंडिया स्टॉप गेनोसाईड अँड फ्री कश्मीर' म्हणजेच ' भारताने काश्मीरमधील नरसंहार थांबवावा आणि ते मुक्त करावे' अशा आशयाचा संदेश लिहिण्यात आला होता.
आयसीसीने केला निषेधया साऱ्या प्रकरणाचा आयसीसीने निषेध केला आहे. ' ही गोष्ट विश्वचषकात दुसऱ्यांदाच घडली. त्यामुळे आम्ही निराश आहोत. आम्ही या गोष्टींची निंदा करतो.'
यापूर्वीही अशीच घटना घडली होतीपाकिस्तान आणि अफगाणिस्तान सामना सुरु होता. यावेळी मैदानावरून एक अनधिकृत विमान गेले. या विमानावर 'जस्टिस फॉर बलूचिस्तान' हे शब्द मोठ्या अक्षरांत लिहिले गेले होते. हे शब्द दोन्ही देशांतील चाहत्यांनी पाहिले आणि त्यांच्यामध्ये जोरदार मारामारी सुरु झाली. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यामध्ये सामना रंगत आहे. पण हा सामना लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात सुरु असताना दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी पाहायला मिळाली. यावेळी दोन्ही देशांच्या चाहत्यांनी प्रतिस्पर्धी देशांच्या चाहच्यांवर चांगलेच हात साफ करून घेतले.पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामना सुरळीत सुरु होता. पण यावेळी अशी एक घटना घडली की, या दोन्ही देशांतील चाहते एकमेकांवर तुटून पडले. या दोन्ही देशांच्या चाहत्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याचे पाहायला मिळाले.