लीड्स, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : भारतीय संघ अखेरच्या साखळी सामन्यात आज श्रीलंकेचा सामना करणार आहे. गुणतालिकेत भारतीय संघ 13 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर ऑस्ट्रेलिया 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. दोन्ही संघ आज साखळी फेरीतील आपापला अखेरचा सामना खेळणार आहे आणि या निकालानंतर उपांत्य फेरीतील प्रतिस्पर्धी निश्चित होतील. उपांत्य फेरीचा सामना खेळण्यापूर्वी भारतीय संघ बाकावर बसलेल्या खेळाडूंची आज चाचपणी करू शकतील.
11:19 PM
भारतीय संघ अव्वल स्थानावर
11:11 PM
भारताचा श्रीलंकेवर विजय
10:03 PM
राहुलचे विश्वचषकातील पहिले शतक
09:36 PM
रोहित शर्मा १०३ धावांवर आऊट
09:26 PM
रोहित शर्माचे शतक
08:51 PM
लोकेश राहुलचे अर्धशतक
08:34 PM
भारताचे शतक पूर्ण
08:25 PM
रोहित शर्माचे दमदार अर्धशतक
06:49 PM
प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेच्या २६४ धावा
06:35 PM
अँजेलो मॅथ्यूज आऊट
06:16 PM
अँजेलो मॅथ्यूजचे शतक
05:47 PM
श्रीलंकेला पाचवा धक्का
05:28 PM
अँजेलो मॅथ्यूजचे अर्धशतक
04:31 PM
श्रीलंकेच्या 20 षटकांत 4 बाद 83 धावा केल्या होत्या.
03:58 PM
हार्दिक पांड्यानं 12व्या षटकात अविष्का फर्नांडोला ( 20) यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले.
03:55 PM
श्रीलंकेने पहिल्या दहा षटकांत 2 बाद 52 धावा केल्या, 2019च्या वर्ल्ड कपमध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या रवींद्र जडेजाने पहिल्याच षटकात कुशल मेंडिसला बाद करून भारताला तिसरे यश मिळवून दिले.
03:37 PM
जसप्रीत बुमराहनं डावाच्या आठव्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेचा दुसरा सलामीवीर कुशल परेराला ( 18) यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले.
03:20 PM
कुशल परेराला जीवदान... हार्दिक पांड्या व कुलदीप यादव यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे झेल सुटला... भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर परेराने टोलावलेला चेंडू... मिड ऑन व मिड ऑफवर असलेल्या खेळाडूंना झेल टिपण्याची होती सोपी संधी
03:16 PM
डावाच्या चौथ्या षटकात श्रीलंकेला पहिला धक्का बसला. जसप्रीत बुमरानहे श्रीलंकेचा सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला (10) यष्टिरक्षक महेंद्रसिंग धोनीकरवी झेलबाद केले
03:14 PM
तिसऱ्या षटकात भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या गोलंदाजीवर श्रीलंकेने 12 धावा चोपून काढल्या.
02:36 PM
भारतीय संघाल दोन बदल करण्यात आले आहेत. युजवेंद्र चहल आणि मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आली असून त्यांच्या जागी रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांना संधी देण्यात आली आहे.
02:27 PM
काय सांगतो खेळपट्टीचा अंदाज?
खेळपट्टीवर गवत असले तरी जलदगती गोलंदांना मदत करणारी असेल. पण, मैदान लहान असल्याने धावांचा पाऊस बसरलेला पाहायला मिळेल. त्यामुळे नाणेफेकीचा कौल बाजूने लागल्यास प्रथम फलंदाजी करावी...
02:21 PM
Web Title: India Vs Sri Lanka Live Score, ICC World Cup 2019 updates & Live Commentary in Marathi
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.