IND vs SL 1st T20 : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ २४ फेब्रुवारीपासून तीन सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे. मात्र त्याआधी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज दीपक चहर (Deepak Chahar) मालिकेतून दुखापतीमुळे बाहेर पडला आहे. आता पहिल्या टी२० सामन्यात दीपक चहरच्या जागी तितकाच धारदार मारा करणारा गोलंदाज संघात येऊ शकतो. भारताच्या या खेळाडूने अनेकदा काही षटकांतच सामन्याचा निकाल पलटवला आहे. जसप्रीत बुमराह बऱ्याच काळानंतर मैदानात परतला आहे. अशा परिस्थितीत मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) हा खेळाडू बुमराहचा नवा गोलंदाजी पार्टनर बनू शकतो.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात दीपक चहरच्या जागी मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते. सिराज अत्यंत चांगल्या लयीत आहे. त्याची स्विंग गोलंदाजी भेदक असते. कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याची क्षमता त्याच्यात आहे. मोहम्मद सिराज चेंडू विकेटच्या अगदी जवळ टाकतो त्यामुळे फलंदाजांना फारशी फटकेबाजी करता येत नाही. धावांच्या बाबतीतही सिराज कंजुष गोलंदाज आहे. वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत त्याने दमदार गोलंदाजी केली होती. तसेच संधी मिळेल तेव्हा तो आपली सर्वोत्तम कामगिरी करून दाखवतो.
मोहम्मद सिराज सध्या चांगलाच फॉर्मात आहे. वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी त्याने दक्षिण आफ्रिकेत आपले गोलंदाजीचे कौशल्य दाखवले. विराट कोहलीने त्याला २०२०-२१ च्या ऑस्ट्रेलियन दौऱ्यावर संधी दिली होती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याने टीम इंडियासाठी अनेक सामने खेळले आणि जिंकवले. तो आयपीएलमध्ये RCBकडून खेळतो. त्याचा भेदक मारा पाहूनच RCB संघाने त्याला रिटेन केलं आहे. त्यामुळे पहिल्या टी२० मध्ये दीपक चहरच्या जागी त्याचा संघात समावेश केला जाऊ शकतो.