India & Pakistan : भारत-पाकिस्तान एकाच वेळी मैदानावर उतरणार; विराट कोहली की बाबर आजम कोण वरचढ ठरणार?

India & Pakistan : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा एकमेकांसमोर असतात तेव्हा संपूर्ण जग थांबलेलं पाहायला मिळतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2022 10:37 AM2022-03-02T10:37:58+5:302022-03-02T10:38:24+5:30

whatsapp join usJoin us
India vs Sri Lanka & Pakistan vs Australia : India-Pakistan to take the field simultaneously; Who will dominate Virat Kohli or Babar Azam? | India & Pakistan : भारत-पाकिस्तान एकाच वेळी मैदानावर उतरणार; विराट कोहली की बाबर आजम कोण वरचढ ठरणार?

India & Pakistan : भारत-पाकिस्तान एकाच वेळी मैदानावर उतरणार; विराट कोहली की बाबर आजम कोण वरचढ ठरणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India & Pakistan : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी क्रिकेटच्या मैदानावर जेव्हा एकमेकांसमोर असतात तेव्हा संपूर्ण जग थांबलेलं पाहायला मिळतं. या दोन्ही देशांमधील क्रिकेट सामना म्हणजे चाहत्यांसाठी मोठा उत्सवच... त्यामुळेच आयसीसी स्पर्धांमधील भारत-पाकिस्तान सामन्याला मोठी मागणी असते आणि अवघ्या काही मिनिटांत सर्व तिकिटांची विक्री झाल्याचा अनुभव अनेकांना आला आहे. पण, भारत-पाकिस्तान यांच्यात केवळ आयसीसी स्पर्धा व आशिया चषक स्पर्धेत सामना होतो. पण, या दोन संघांमधील कसोटी सामन्यांची मालिका बंदच झाली आहे.  क्रिकेटच्या खऱ्या फॉरमॅटमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यात सामना पाहण्याची उत्सुकता आहे. ती पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे, पण शुक्रवारी भारत आणि पाकिस्तान एकाच वेळी मैदानावर उतरणार आहेत.

भारत -श्रीलंका ( India vs Sri Lanka) यांच्यात आणि पाकिस्तान-ऑस्ट्रेलिया ( Pakistan vs Australia) यांच्यातल्या कसोटी सामन्याला ४ मार्चला सुरूवात होणार आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या कसोटीवर सर्वांचे लक्ष असणार आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याचा हा १००वा कसोटी सामना आहे आणि त्याच्या ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकाची प्रतीक्षा मोहालीत संपण्याची अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ १९९८नंतर प्रथमच पाकिस्तान दौऱ्यावर दाखल झाला आहे. येथे तीन कसोटी, तीन वन डे व एक ट्वेंटी-२० सामना ते खेळणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) ही ऐतिहासिक कसोटी अविस्मरणीय बनवण्यासाठी प्रयत्नशील असणार आहे.

भारताचा कसोटी संघ: रोहित शर्मा (कर्णधार), मयांक अग्रवाल, प्रियांक पांचाळ, विराट कोहली, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, शुभमन गिल, रिषभ पंत, केएस भरत, रविंद्र जाडेजा, जयंत यादव, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, सौरभ कुमार, रवि अश्विन (फिटनेस पाहून निर्णय घेणार)

श्रीलंकेचा कसोटी संघ : दिमुथ करुणारत्ने (कर्णधार), पाथुम निसंका, लाहिरू थिरिमने, धनंजया डी सिल्वा (उपकर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, दिनेश चंडिमल, चारिथ असलंका, निरोशन डिक्वेल्ला, चमिका करुणारत्ने, लाहिरु कुमारा, सुरंगा लकमल, दुष्मंथा चमीरा, विश्वा फर्नांडो, जेफ्री वँडरसे, प्रवीण जयविक्रमे, लसिथ एम्बुल्डेनिया, कुशल मेंडिस (फिटनेस पाहून निर्णय घेणार) 

कसोटीचे वेळापत्रक
पहिली कसोटी - ४ ते ८ मार्च, मोहाली
दुसरी कसोटी - १२ ते १६ मार्च ( डे नाईट),  बंगळुरू 


पाकिस्तानचा कसोटी संघ - बाबर आजम ( कर्णधार), अब्दुल्लाह शफिक, अझर अली, फहीम अश्रफ, फवाद आलम, हॅरीस रौफ, हसन अली, इमाम-उल-हक, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, नौमान अली, साजीद खान, सौद शकील, शाहिन शाह आफ्रिदी, शान मसून, जाहीद महमूद, 

ऑस्ट्रेलियाचा कसोटी संघ - पॅट कमिन्स ( कर्णधार), अॅश्टन अॅगर, स्कॉट बोलंड, अॅलेक्स  केरी, कॅमेरून ग्रीन, मार्कस हॅरीस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, मिचेल मार्श्, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्क स्टेकेटी, मिचेल स्वेप्सन, डेव्हिड वॉर्नर, मिचेल नेसेर.

वेळापत्रक
४ ते ८ मार्च पहिली कसोटी
१२ ते १६ मार्च दुसरी कसोटी
२१ ते २५ मार्च तिसरी कसोटी

Web Title: India vs Sri Lanka & Pakistan vs Australia : India-Pakistan to take the field simultaneously; Who will dominate Virat Kohli or Babar Azam?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.