Rohit Sharma, IND Vs SL : भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा आणि गेल्या मालिकेतील त्याचा सलामीवीर साथीदार Ishan Kishan यांना फारशी कमाल करता आली नाही. असं असलं तरी हिटमॅन रोहित हा त्याच्या स्फोटक फलंदाजीसाठी जगभर प्रसिद्ध आहे. जगातील प्रत्येक मैदानावर त्याने धावा केल्या आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी२० मध्ये वेस्ट इंडिजचा पराभव केला. आता सर्वांच्या नजरा २४ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या श्रीलंका मालिकेकडे लागल्या आहेत. या मालिकेत कर्णधार रोहित शर्मा एका बड्या विक्रमाच्या नजीक आहे. महत्त्वाची बाब म्हणजे युनिव्हर्स बॉस आणि टी२० किंग अशा उपाधी मिरवणारा ख्रिस गेलदेखील या विक्रमाच्या आसपास नाहीये.
भारतीय संघाला उद्या लखनौ येथे श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांच्या टी२० मालिकेतील पहिला सामना खेळायचा आहे. जर रोहित शर्माने टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी १२ षटकार लगावले तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनणार आहे. रोहित शर्माच्या नावावर सध्या १५४ षटकार आहेत. त्याच वेळी न्यूझीलंडचा मार्टिन गप्टिल हा १६५ षटकारांसह त्याच्या पुढे आहेत. श्रीलंका मालिकेत 'हिटमॅन'ची बॅट तळपली तर तो हा एकच नव्हे तर एकाच वेळी अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
दरम्यान, भारताच्या श्रीलंका दौऱ्याची सुरूवात टी२० मालिकेने होणार आहे. २४ फेब्रुवारीला लखनौच्या मैदानावर पहिली टी२० रंगणार आहे. त्यानंतर २६ आणि २७ असे सलग दोन दिवस धर्मशालाच्या मैदानावर दुसरी व तिसरी टी२० कसोटी खेळण्यात येणार आहे. या मालिकेनंतर दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळली जाणार आहे. पहिली कसोटी ४ ते ८ मार्च दरम्यान खेळली जाणार आहे. तर दुसऱी कसोटी ही दिवस-रात्र पद्धतीची कसोटी असणार आहे.