रोहित शर्मा नेहमीच नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी ओळखला जातो. बीसीसीआयने त्याच्या नेतृत्वाखालील श्रीलंका मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. भारताला श्रीलंकेविरुद्ध तीन टी-20 आणि दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातच आता अनेक दिवसांनी टीम इंडियामध्ये एका खेळाडूचे पुनरागमन झाले आहे. हा खेळाडू ऋषभ पंतप्रमाणेच त्याच्या फलंदाजीसाठी ओळखला जातो.
या खेळाडूचे पुनरागमन
श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी निवडकर्त्यांनी संजू सॅमसन या मजबूत यष्टिरक्षक फलंदाजाचा समावेश केला आहे. संजू सॅमसनने आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी केली आहे. त्याने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्ससाठी खूप धावा केल्या आहेत आणि तो नेहमीच मोठ्या खेळी खेळण्यासाठी ओळखला जातो. त्याचे यष्टिरक्षण कौशल्यही अप्रतिम आहे. आता प्रदीर्घ काळानंतर त्याला रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा सदस्य बनण्याची संधी मिळाली आहे.
कोहलीने दुर्लक्ष केले
विराट कोहलीने आपल्या कर्णधारपदात संजू सॅमसनकडे नेहमीच दुर्लक्ष केले. निवडकर्त्यांनीही त्याला फारशी संधी दिली नाही. कोहलीच्या नेतृत्वाखाली ऋषभ पंतला अधिक संधी देण्यात आल्या. संजू सॅमसनला संधी दिल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठा करिष्मा करू शकतो, असे क्रिकेटपंडितांचे मत आहे. त्याच्याकडे विकेटवर टिकून राहण्याची अप्रतिम क्षमता आहे, एकदा तो क्रीजवर स्थिरावला की, त्यानंतर विरोधी गोलंदाजांचा धुव्वा उडणार हे नक्की. संजू सॅमसनने अखेरचा सामना जुलै 2021 मध्ये श्रीलंकेविरोधात खेळला होता. आता पुन्हा त्याला श्रीलंकेविरुद्धच संधी मिळाली आहे.
सॅमसनची जबरदस्त फलंदाजी
संजू सॅमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याची आक्रमक खेळी पाहून राजस्थान रॉयल्सने त्याला आपला कर्णधार बनवले आहे. संजू सॅमसनने आयपीएलमध्ये 121 सामन्यांमध्ये 3068 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये दोन धडाकेबाज शतकांचा समावेश आहे. संजूने भारतासाठी 1 एकदिवसीय सामन्यात 46 धावा आणि 10 टी-20 सामन्यात 117 धावा केल्या आहेत. आता कर्णधार रोहित शर्माकडून श्रीलंकेविरुद्ध मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.
श्रीलंका मालिकेसाठी भारतीय T20 संघ:
रोहित शर्मा(कर्णधार), ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, कुलदीप यादव आणि आवेश खान.
Web Title: India vs Sri Lanka: Sanju Samson given a chance in Srilanka series by Rohit Sharma
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.