Join us  

India vs Sri Lanka Test Series : भारतीय संघाच्या बसमध्ये काडतूस सापडल्यानं खळबळ, कसोटीसाठी चंडिगढला खेळाडू दाखल 

India vs Sri Lanka Test Series : ट्वेंटी-२० मालिकेनंतर भारत-श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे आणि पहिली कसोटी मोहाली येथे ४ मार्चपासून सुरू होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2022 4:27 PM

Open in App

India vs Sri Lanka Test Series : ट्वेंटी-२० मालिकेनंतर भारत-श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे आणि पहिली कसोटी मोहाली येथे ४ मार्चपासून सुरू होणार आहे. भारताचा माजी कर्णधार विराट कोहली ( Virat kohli) त्याच्या १००व्या कसोटीसाठी मोहालीत दाखल झाला आहे आणि त्याने सरावालाही सुरूवात केली आहे. भारत-श्रीलंका यांच्या कसोटी संघातील बरेच खेळाडू मोहालीत दाखल झाले आहेत. चंडिगढ येथे एका हॉटेलमध्ये त्यांच्या राहण्याची सोय केली गेली आहे. खेळाडूंना स्टेडियम ते हॉटेल ने आण करण्यासाठी बसची सोय केली गेली आहे, परंतु शनिवारी या बसमध्ये दोन निकामी काडतूस सापडल्याने एकच खळबळ उडाली.

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार खेळाडूंना ने आण करणारी बस ही तारा ब्रदर्सची आहे आणि ती आयटी पार्क येथील हॉटेल ललित बाहेर उभी असते. जेथे दोन्ही संघांच्या खेळाडूंची राहण्याची सोय केली आहे. बसमध्ये काडतूस सापडल्यानंतर बॉम्ब स्क्वॉड आणि पोलिसांना बोलावण्यात आले आणि पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर मोहालीतील PCA स्टेडियमचीही पाहणी करण्यात आली. पोलिसांनी ही काडतूस जप्त केली आहेत.  

पोलिसांच्या माहितीनुसार ही बस लग्नासाठी बुक केली गेली असावी आणि त्यावेळेस कुणीतरी फायरिंग केली असावी. त्याची ही काडतूस बसमध्येस पडली असावीत. पोलीस बस ड्रायव्हरची चौकशी करत आहेत. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी आर अश्वि, मोहम्मद शमी, उमेश यादव, शुबमन गिल, हनुमा विहारी, प्रियांक पांचाळ, जयंत यादव,  सौरभ कुमार, केएस भरत आणि विराट कोहली हे ललित हॉटेलमध्ये मुक्कामाला आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध श्रीलंकाविराट कोहलीचंडीगढ़
Open in App