कोलंबो : खराब परिस्थितीचा सामना करीत असलेल्या श्रीलंका क्रिकेटला दिलासा देणारी बातमी आहे. भारतीय संघ २०२४ च्या जुलै-ऑगस्टमध्ये सहा (३ एकदिवसीय, ३ टी-२०) मर्यादीत षटकांच्या सामन्यांच्या मालिकेसाठी या देशाचा दौरा करेल. श्रीलंका क्रिकेटने (एसएलसी) बुधवारी ही घोषणा केली.
सरकारच्या हस्तक्षेपामुळे आयसीसीने लंका बोर्डावर बंदी घातली. शिवाय १९ वर्षांखालील विश्वचषक यजमानपद हिसकावून ते दक्षिण आफ्रिकेला दिले. पुरुष व महिला संघांना मात्र द्विपक्षीय मालिकेसाठी लंका दौऱ्यावर येण्याची परवानगी आहे. भारतीय संघ जुलै-ऑगस्टमध्ये ३ एकदिवसीय व ३ टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी येथे येईल. लंकेचा पुरुष संघ २०२४ मध्ये ५२ सामने खेळेल. त्यात १० कसोटी, २१ एकदिवसीय व २१ टी-२० सामने आहेत.