India Tour of Sri Lanka in 2024: ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंतर शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली भारताचा युवा संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार आहे. त्यानंतर २७ जुलैपासून टीम इंडियाचा श्रीलंका दौराही नियोजित आहे आणि त्याचे वेळापत्रक आज जाहीर झाले. भारतीय संघ या दौऱ्यावर ३ ट्वेंटी-२० व ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहे. झिम्बाब्वे दौऱ्यासाठी BCCI ने शुबमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंची निवड केली आहे आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना विश्रांती दिली आहे.
India vs Zimbabweपहिली ट्वेंटी-२० - ६ जुलै, हरारेदुसरी ट्वेंटी-२० - ७ जुलै, हरारेतिसरी ट्वेंटी-२० - १० जुलै, हरारेचौथी ट्वेंटी-२० - १३ जुलै, हरारेपाचवी ट्वेंटी-२०- १४ जुलै, हरारे
१४ जुलैला झिम्बाब्वे दौऱ्यावरील शेवटचा व पाचवा ट्वेंटी-२० सामना खेळला जाईल आणि तोच संघ कदाचित श्रीलंका दौऱ्यावरील ट्वेंटी-२० मालिकेत खेळेल. पण, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धा लक्षात घेता वन डे मालिकेत सीनियर खेळाडूंना खेळावे लागेल. त्यामुळे रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पांड्या, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर हे वन डे मालिकेत दिसतील. भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर २७ जूलै, २८ जुलै व ३० जुलै रोजी ट्वेंटी-२० सामने खेळतील. त्यानंतर २ ऑगस्टपासून वन डे मालिकेला सुरुवात होईल आणि त्यातील दुसरा व तिसरा वन डे सामना अनुक्रमे ४ व ७ ऑगस्टला खेळवला जाईल. India vs Bangladeshपहिली कसोटी - १९ ते २३ सप्टेंबर - चेन्नईदुसरी कसोटी - २७ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर- कानपूरपहिली ट्वेंटी-२० - ६ ऑक्टोबर, धर्मशालादुसरी ट्वेंटी-२० - ९ ऑक्टोबर, दिल्लीतिसरी ट्वेंटी-२० - १२ ऑक्टोबर, हैदराबाद
India vs New Zealandपहिली कसोटी - १६ ते २० ऑक्टोबर, बंगळुरुदुसरी कसोटी - २४ ते २८ ऑक्टोबर, पुणेतिसरी कसोटी - १ ते ५ नोव्हेंबर, मुंबई
India vs Australiaपहिली कसोटी - २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थदुसरी कसोटी - ६ ते १० डिसेंबर, एडिलेडतिसरी कसोटी- १४ ते १८ डिसेंबर, ब्रिस्बनचौथी कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्नपाचवी कसोटी - ३ ते ७ जानेवारी २०२५, सिडनी
India vs Englandपहिली ट्वेंटी-२० - २२ जानेवारी, चेन्नईदुसरी ट्वेंटी-२० - २५ जानेवारी, कोलकातातिसरी ट्वेंटी-२० - २८ जानेवारी, राजकोटचौथी ट्वेंटी-२० - ३१ जानेवारी, पुणेपाचवी ट्वेंटी-२० - २ फेब्रुवारी, मुंबईपहिली वन डे - ६ फेब्रुवारी, नागपूरदुसरी वन डे - ९ फेब्रुवारी, कटकतिसरी वन डे - १२ फेब्रुवारी, अहमदाबाद
सुरुवात होणे अपेक्षित१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला०२५ इंडियन प्रीमिअर लीग २जून मध्ये जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल