कोलंबो : भारत-श्रीलंका यांच्यातील महिलांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. पावसामुळे या सामन्याला अर्ध्या तास उशिरा सुरुवात झाली होती.भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. पावसामुळे खेळ थांबला त्यावेळी श्रीलंकेने ७.५ षटकांत ३ बाद ४९ धावा केल्या होत्या. अरुंधती रेड्डी, दिप्ती शर्मा आणि पूनम यादव यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. श्रीलंकेकडून चामरी अटापट्टू हिने सर्वाधिक २१ धावा केल्या. सामन्यावर भारतीय संघाने वर्चस्व मिळवले होते. त्यामुळे श्रीलंकन संघ दबावात होता.दरम्यान, मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने १३ धावांनी जिंकला होता. आता पुढील सामना शनिवारी खेळविण्यात येईल. (वृत्तसंस्था)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारत वि. श्रीलंका महिला टी२० सामना पावसामुळे रद्द
भारत वि. श्रीलंका महिला टी२० सामना पावसामुळे रद्द
भारत-श्रीलंका यांच्यातील महिलांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा टी-२० सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2018 5:11 AM