Join us  

INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड

सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत श्रीलंकेची चामरी अट्टापटू अव्वलस्थानी आहे. पण तिने जेमिमाच्या दुप्पट सामने खेळले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2024 6:34 PM

Open in App

India vs Sri Lanka, Women’s T20 World Cup 2024 : महिला टी-२० वर्ल्ड  कप स्पर्धेत भारतीय महिला संघासाठी श्रीलंके विरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. हा सामना फक्त जिंकण्यापेक्षा धावगती सुधारण्याच्या इराद्याने  भारतीय संघ मैदानात उतरेल. स्मृती मानधनासह शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्स यांच्याकडून या सामन्यात मोठ्या फटकेबाजीची अपेक्षा आहे.    

लंकेविरुद्ध भारतीय संघ भारीच, पण...

महिला आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यात आतापर्यंत २५ सामने खेळवण्यात आले आहेत. त्यात १९ वेळा टीम इंडियाने बाजी मारलीये. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघाने फक्त ५ वेळाच विजय मिळवला आहे. एक सामना हा अनिर्णित देखील राहिला आहे. टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतही भारतीय संघच भारी ठरलाय. ५ पैकी ४ सामन्यात भारतीय संघाने लंकेला मात दिलीये.  दोन्ही संघातील रेकॉर्ड भारताच्या बाजूनं असला आशिया कप स्पर्धेच्या फायनलमध्ये श्रीलंकेच्या संघाने भारताला मोठा दणका दिला होता. आशिया कप स्पर्धेतील फायनलमधील पराभवाची परतफेड करण्यासाठी भारतीय संघ प्रयत्नशील असेल. 

लंकेविरुद्ध मुंबईकर छोरीचा डंका

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मुंबईकर छोरी जेमिमा रॉड्रिग्ज ही कॅप्टन हरमप्रीत आणि सलामीची स्फोटक फलंदाज स्मृती मानधनापेक्षा भारी ठरलीये. श्रीलंकेविरुद्धच्या १३ सामन्यातील १२ डावात जेमिमानं ४२७ धावा कुटल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश असून ७६ ही तिची सर्वोच्च खेळी राहिली आहे. भारत-श्रीलंका यांच्यातील लढतीत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत श्रीलंकेची चामरी अट्टापटू अव्वलस्थानी आहे. पण तिने जेमिमाच्या दुप्पट सामने खेळले आहेत. २४ सामन्यातील २४ डावात तिच्या खात्यात ५७५ धावांची नोंद आहे.

कसा आहे स्मृती मानधना अन् हरमनप्रीतचा रेकॉर्ड

भारत-श्रीलंका यांच्यातील लढतीत सर्वाधिक धावा करणाऱ्या बॅटरच्या यादीत मिताली राज तिसऱ्या क्रमांकावर आहे. १६ सामन्यातील १४ डावात तिने ४ अर्धशतकासह ३९९ धावा काढल्या आहेत. त्यापाठोपाठ या यादीत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रित कौरचा नंबर लागतो.  हरमनप्रीतनं २३ सामन्यातील १८ डावात एका अर्धशतकासह ३८२ धावा केल्या आहेत. स्मृती मानधना हिने २० सामन्यातील १९ डावात २ अर्धशतकाच्या मदतीने श्रीलंकेविरुद्ध ३७९ धावा केल्या आहेत.

 

टॅग्स :आयसीसी महिला टी२० विश्वचषकजेमिमा रॉड्रिग्जस्मृती मानधनाहरनमप्रीत कौरभारतीय क्रिकेट संघश्रीलंका