नशीबाने थट्टा आज मांडली! इशान किशनची कॅच सुटली, पण विंडीजला हार्दिक पांड्याची विकेट मिळाली 

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : वन डे वर्ल्ड कप तयारीपूर्वी युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी फलंदाजीसाठी मैदानावर उशीरा उतरण्याचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 10:50 PM2023-07-27T22:50:26+5:302023-07-27T22:51:07+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Hardik Pandya run-out on 5 of 7 balls, Kishan hammered this back at Cariah who tried to catch it but couldn't. But the ball deflects onto the stumps with Hardik stretching back | नशीबाने थट्टा आज मांडली! इशान किशनची कॅच सुटली, पण विंडीजला हार्दिक पांड्याची विकेट मिळाली 

नशीबाने थट्टा आज मांडली! इशान किशनची कॅच सुटली, पण विंडीजला हार्दिक पांड्याची विकेट मिळाली 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : वन डे वर्ल्ड कप तयारीपूर्वी युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी फलंदाजीसाठी मैदानावर उशीरा उतरण्याचा निर्णय घेतला. इशान किशन व शुबमन गिल ही जोडी सलामीला आली. त्यानंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा मैदानावर उतरले. प्रमोशन मिळालेल्या सूर्या व हार्दिक यांना काही खास करता आले नाही. हार्दिकची विकेट तर वेस्ट इंडिजला गिफ्ट म्हणून मिळाली. इशानने वन डेतील चौथे अर्धशतक ४४ चेंडूंत पूर्ण केले आणि भारताला ३ बाद ९३ धावांपर्यंत पोहोचवले.

 वाह रे कॅप्टन! इयान बिशॉप यांच्याकडून रोहित शर्माचं कौतुक; विराटचंही हिटमॅनच्या पावलावर पाऊल


रवींद्र जडेजा व कुलदीप यादव यांनी विंडीजचा संपूर्ण संघ ११४ धावांत तंबूत पाठवला. विंडीजचे अखेरचे ७ फलंदाज अवघ्या २६ धावांचे योगदान देऊन माघारी परतले. हार्दिक पांड्या, मुकेश कुमार व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटूंना पाचारण केले. रवींद्र जडेजाने ७ चेंडूंच्या फरकाने विंडीजच्या शिमरोन हेटमायर ( ११), रोव्हमन पॉवेल ( ४) व रोमारिओ शेफर्ड ( ०) यांना माघारी पाठवले. कुलदीपने ३ षटकांत ६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकं निर्धाव टाकली.  कुलदीपने विंडीज कर्णधार शे होप ( ४३), डॉमिनिक ड्रॅक्स ( ३), यानिक कॅरिह ( ३) आणि जेडेन सील्स ( ०) यांच्या विकेट्स मिळवल्या. ( पाहा कुलदीपच्या ४ विकेट्स )  


११५ धावांचे माफक लक्ष्य असताना रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला. रोहितने आज इशान किशन व शुबमन गिल या युवा फलंदाजांना सलामीला पाठवले. शुबमनचा फॉर्म आजच्या सामन्यातही हरवलेला दिसला आणि ७ धावांवर तो झेलबाद झाला.  तिसऱ्या क्रमांकावर विराट येणं अपेक्षित होतं, परंतु सूर्यकुमार यादवला प्रमोशन दिले गेले. सूर्याने त्याचे भात्यातील ३६० डिग्री फटके मारले, परंतु १९ धावांवर तो पायचीत झाला. गुडाकेश मोतीने त्याला फिरकीवर LBW केले आणि इशानसोबत ३६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. हार्दिक पांड्या ( ५) रन आऊट होऊन माघारी परतला. 


यानिक कारिया याच्या गोलंदाजीवर इशानने खणखणीत सरळ फटका मारला. कारियाच्या हातात तो झेल होता, परंतु चेंडूचा वेग एवढा होता की तो त्याच्या हातून सुटला. पण, तो चेंडू नॉन स्ट्रायकर एंडवरील यष्टिंवर जाऊन आदळला. हार्दिकने क्रिज सोडली होती आणि तो बॅट टेकेपर्यंत चेंडूने बेल्स उडवल्या होत्या. तिसऱ्या अम्पायरने हार्दिकला रन आऊट दिले. 

Web Title: India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Hardik Pandya run-out on 5 of 7 balls, Kishan hammered this back at Cariah who tried to catch it but couldn't. But the ball deflects onto the stumps with Hardik stretching back

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.