इशान किशनचा मौके पे चौका! भारत जिंकला, पण ११५ धावा करण्यासाठी गमावले ५ फलंदाज

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 11:12 PM2023-07-27T23:12:34+5:302023-07-27T23:14:28+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Ishaan Kishan scored half century, India have defeated West Indies by 5 wickets | इशान किशनचा मौके पे चौका! भारत जिंकला, पण ११५ धावा करण्यासाठी गमावले ५ फलंदाज

इशान किशनचा मौके पे चौका! भारत जिंकला, पण ११५ धावा करण्यासाठी गमावले ५ फलंदाज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : वन डे वर्ल्ड कप तयारीपूर्वी युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी फलंदाजीसाठी मैदानावर उशीरा उतरण्याचा निर्णय घेतला. इशान किशन व शुबमन गिल ही जोडी सलामीला आली. त्यानंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा मैदानावर उतरले. प्रमोशन मिळालेल्या सूर्या व हार्दिक यांना काही खास करता आले नाही. इशानने अर्धशतक झळकावताना रोहितचा निर्णय योग्य ठरवला, पण ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताने पाच विकेट्स गमावल्या.

वाह रे कॅप्टन! इयान बिशॉप यांच्याकडून रोहित शर्माचं कौतुक; विराटचंही हिटमॅनच्या पावलावर पाऊल

Image
११५ धावांचे माफक लक्ष्य असताना रोहितने सलामीला न येण्याचा निर्णय घेतला. रोहितने आज इशान व शुबमन या युवा फलंदाजांना सलामीला पाठवले. शुबमनचा फॉर्म आजच्या सामन्यातही हरवलेला दिसला आणि ७ धावांवर तो झेलबाद झाला.  तिसऱ्या क्रमांकावर विराट येणं अपेक्षित होतं, परंतु सूर्यकुमार यादवला प्रमोशन दिले गेले. सूर्याने त्याचे भात्यातील ३६० डिग्री फटके मारले, परंतु १९ धावांवर तो पायचीत झाला. गुडाकेश मोतीने त्याला फिरकीवर LBW केले आणि इशानसोबत ३६ धावांची भागीदारी संपुष्टात आली. हार्दिक पांड्या ( ५) रन आऊट होऊन माघारी परतला. 

नशीबाने थट्टा आज मांडली! इशान किशनची कॅच सुटली, पण विंडीजला हार्दिक पांड्याची विकेट मिळाली 


चौथी विकेट पडूनही रोहित व विराट मैदानावर न उतरल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. शार्दूल ठाकूरला ( १) पुढे पाठवले, परंतु त्याला कारियाने अप्रतिम चेंडूवर झेलबाद केले. १२ वर्षांत जे कधीच घडले नव्हते ते रोहितसोबत आज घडले आणि तो सातव्या क्रमांकावर वन डेत फलंदाजीला आला. २०११ मध्ये तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला. कारियाने अप्रतिम चेंडू टाकून रोहितला सुरुवातीला अडचणीत आणले, परंतु रोहितने एकच रिव्हर्स स्वीप मारून विंडीजच्या गोलंदाजाला जागेवर आणले. भारताने २२.५ षटकांत ५ बाद ११५ धावा करून मॅच जिंकली. इशानने ४६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या.

Image
तत्पूर्वी, रवींद्र जडेजाकुलदीप यादव यांनी विंडीजचा संपूर्ण संघ ११४ धावांत तंबूत पाठवला. विंडीजचे अखेरचे ७ फलंदाज अवघ्या २६ धावांचे योगदान देऊन माघारी परतले. हार्दिक पांड्या, मुकेश कुमार व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. रवींद्रने ७ चेंडूंच्या फरकाने विंडीजच्या शिमरोन हेटमायर ( ११), रोव्हमन पॉवेल ( ४) व रोमारिओ शेफर्ड ( ०) यांना माघारी पाठवले. कुलदीपने ३ षटकांत ६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकं निर्धाव टाकली.  कुलदीपने विंडीज कर्णधार शे होप ( ४३), डॉमिनिक ड्रॅक्स ( ३), यानिक कॅरिह ( ३) आणि जेडेन सील्स ( ०) यांच्या विकेट्स मिळवल्या.

Web Title: India vs West Indies, 1st ODI Live Marathi : Ishaan Kishan scored half century, India have defeated West Indies by 5 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.