India vs West Indies, 1st ODI Live Marathi : वन डे वर्ल्ड कप तयारीपूर्वी युवा खेळाडूंना संधी मिळावी, यासाठी रोहित शर्मा व विराट कोहली यांनी फलंदाजीसाठी मैदानावर उशीरा उतरण्याचा निर्णय घेतला. इशान किशन व शुबमन गिल ही जोडी सलामीला आली. त्यानंतर सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या व रवींद्र जडेजा मैदानावर उतरले. प्रमोशन मिळालेल्या सूर्या व हार्दिक यांना काही खास करता आले नाही. इशानने अर्धशतक झळकावताना रोहितचा निर्णय योग्य ठरवला, पण ११५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी भारताने पाच विकेट्स गमावल्या.
वाह रे कॅप्टन! इयान बिशॉप यांच्याकडून रोहित शर्माचं कौतुक; विराटचंही हिटमॅनच्या पावलावर पाऊल
नशीबाने थट्टा आज मांडली! इशान किशनची कॅच सुटली, पण विंडीजला हार्दिक पांड्याची विकेट मिळाली
चौथी विकेट पडूनही रोहित व विराट मैदानावर न उतरल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले होते. शार्दूल ठाकूरला ( १) पुढे पाठवले, परंतु त्याला कारियाने अप्रतिम चेंडूवर झेलबाद केले. १२ वर्षांत जे कधीच घडले नव्हते ते रोहितसोबत आज घडले आणि तो सातव्या क्रमांकावर वन डेत फलंदाजीला आला. २०११ मध्ये तो सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला. कारियाने अप्रतिम चेंडू टाकून रोहितला सुरुवातीला अडचणीत आणले, परंतु रोहितने एकच रिव्हर्स स्वीप मारून विंडीजच्या गोलंदाजाला जागेवर आणले. भारताने २२.५ षटकांत ५ बाद ११५ धावा करून मॅच जिंकली. इशानने ४६ चेंडूंत ७ चौकार व १ षटकारासह ५२ धावा केल्या.