India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाच्या वन डे वर्ल्ड कप तयारीच्या अंतिम टप्प्याला आजपासून सुरूवात झाली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची वन डे मालिका भारताच्या तयारीच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. त्यामुळे जे जे खेळाडू वर्ल्ड कप संघाच्या यादीत आहेत त्यांना अधिकाधिक संधी देण्याचा संघ व्यवस्थापनाचा प्रयत्न आहे. वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ ११४ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाच्या वर्ल्ड कप तयारीच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला अन् विंडीजचे दिग्गज इयान बिशॉप यांनी त्याचे कौतुक केले.
३-२-६-४! कुलदीप यादव ४ महिन्यांनी वन डेत परतला, सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडला
रवींद्र जडेजा व कुलदीप यादव या भारतीय फिरकीपटूंसमोर वेस्ट इंडिजने अक्षरशः गुडघे टेकले. ७ वाजता सुरू झालेला डाव ९.०४ मिनिटांनी आटोपला अन् विंडीजचा संपूर्ण संघ ११४ धावांत तंबूत परतला. विंडीजचे अखेरचे ७ फलंदाज अवघ्या २६ धावांचे योगदान देऊन माघारी परतले. हार्दिक पांड्या, मुकेश कुमार व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्यानंतर रोहित शर्माने फिरकीपटूंना पाचारण केले. रवींद्र जडेजाने ७ चेंडूंच्या फरकाने विंडीजच्या शिमरोन हेटमायर ( ११), रोव्हमन पॉवेल ( ४) व रोमारिओ शेफर्ड ( ०) यांना माघारी पाठवले. कुलदीपने ३ षटकांत ६ धावा देताना ४ विकेट्स घेतल्या. त्याने २ षटकं निर्धाव टाकली. कुलदीपने विंडीज कर्णधार शे होप ( ४३), डॉमिनिक ड्रॅक्स ( ३), यानिक कॅरिह ( ३) आणि जेडेन सील्स ( ०) यांच्या विकेट्स मिळवल्या.