Join us  

टाटा, बाय-बाय, खतम! २ तासांत विंडीजचा खेळ खल्लास; कुलदीप-जड्डूने २६ धावांत ७ फलंदाज पाठवले माघारी

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद ठरल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ वन डे मालिकेत संघर्ष दाखवेल अशी अपेक्षा फोल ठरली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 9:07 PM

Open in App

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : वर्ल्ड कप स्पर्धेतून बाद ठरल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ वन डे मालिकेत संघर्ष दाखवेल अशी अपेक्षा फोल ठरली. रवींद्र जडेजाकुलदीप यादव या भारतीय फिरकीपटूंसमोर त्यांनी अक्षरशः गुडघे टेकले. दोन तासांत विंडीजचा डाव आटोपला. कुलदीप व जडेजा यांनी २६ धावांत शेवटच्या ७ विकेट्स घेतल्या.

हार्दिक पांड्याने तिसऱ्याच षटकात कायल मेयर्सला माघारी पाठवले. ब्रेंडन किंस आणि एलिक अथानेझ यांनी डाव सावरला होता, परंतु मुकेश कुमारने त्याची विकेट मिळवली. त्याने १८ चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह २२ धावा केल्या आणि रवींद्र जडेजाने अफलातून झेल घेतला.  पुढील षटकात ब्रेंडन किंग ( १७) चा शार्दूलने त्रिफळा उडवला. शे होप आणि शिमरोन हेटमायर यांनी ४५ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी करून विंडीजचा डाव सावरला होता. पण, जडेजाच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात हेटमारचा ( ११) त्रिफळा उडाला. जडेजाने पुढच्याच षटकात रोव्हमन पॉवेलला ( ४) बाद करून विंडीजचा निम्मा संध ९६ धावांत माघारी पाठवला.  

रोमारिओ शेफर्डचा दुसऱ्या स्लीपमध्ये विराट कोहलीने चपळाईने झेल टिपला. कुलदीप यादवने त्याच्या पहिल्याच षटकात डॉमिनिक ड्रॅक्सला माघारी पाठवून सातवा धक्का दिला. कर्णधार शे होप एकटा खिंड लढवत होता, परंतु कुलदीपने त्याला LBW केले. होप ४५ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह ४३ धावा केल्या. विंडीजने २६ धावांत ७ विकेट्स गमावल्या. कुलदीपने चौथी विकेट घेताना विंडीजचा डाव ११४ धावांवर गुंडाळला. 

 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजकुलदीप यादवरवींद्र जडेजा
Open in App