Join us  

७ चेंडूंत ३ विकेट्स! रवींद्र जडेजाने विंडीजला धक्के दिले, विराट कोहलीच्या कॅचने चकित केले, Video

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज ९९ धावांवर माघारी पाठवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2023 8:44 PM

Open in App

India vs West Indies, 1st ODI Live Marathi : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात वेस्ट इंडिजचे ७ फलंदाज ९९ धावांवर माघारी पाठवले आहेत. हार्दिक पांड्याने तिसऱ्या षटकात पहिला धक्का दिला, त्यानंतर पदार्पणवीर मुकेश कुमार आणि शार्दूल ठाकूर यांनीही विकेट घेतली. कर्णधार रोहित शर्माने फिरकीपटू रवींद्र जडेजाला पाचारण केले आणि पठ्ठ्याने ७ चेंडूंत ३ फलंदाज माघारी पाठवले. विराट कोहलीने ( Virat Kohli) दुसऱ्या स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपून विंडिजचा सहावा फलंदाज माघारी पाठवला.  (IND vs WI Live Scoreboard ) 

हार्दिक पांड्याने आज गोलंदाजीची सुरुवात केली आणि तिसऱ्याच षटकात त्याने विकेट मिळवून दिली. हार्दिकच्या गोलंदाजीवर कायल मेयर्सने पुढे येऊन फटका मारला, परंतु मिड ऑनला रोहितने सोपा झेल टिपला.  ब्रेंडन किंस आणि एलिक अथानेझ यांनी चांगला खेळ केला होता. कसोटी मालिकेत अथानेझने पदार्पण करताना आपले कौशल्य दाखवून दिले होते आणि त्यामुळेच त्याला वन डेत संधी दिली गेली. हार्दिकला त्याने मारलेला षटकात अप्रतिम होता. त्याने १८ चेंडूंत ३ चौकारही लगावले अन् २२ धावा केल्या. पण, पदार्पणवीर मुकेशने टाकलेल्या चेंडूवर मारलेला फटका फसला अन् रवींद्र जडेजाने अफलातून झेल घेतला. त्यानंतर पुढील षटकात ब्रेंडन किंग ( १७) चा शार्दूलने त्रिफळा उडवला. 

मुकेश कुमारच्या गोलंदाजीवर रवींद्र जडेजाचा अफलातून झेल; शार्दूल ठाकूरने उडवला 'दांडा', Video 

शे होप आणि शिमरोन हेटमायर यांनी ४५ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी करून विंडीजचा डाव सावरला होता. पण, जडेजाच्या चेंडूवर स्वीप मारण्याच्या प्रयत्नात हेटमारचा ( ११) त्रिफळा उडाला. जडेजाने पुढच्याच षटकात रोव्हमन पॉवेलला ( ४) बाद करून विंडीजचा निम्मा संध ९६ धावांत माघारी पाठवला. शुबमन गिलने स्लीपमध्ये अप्रतिम झेल घेतला. कुलदीप यादवने त्याच्या पहिल्याच षतकात डॉमिनिक ड्रॅक्सला माघारी पाठवून सातवा धक्का दिला.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरवींद्र जडेजाविराट कोहली
Open in App