गयाना, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळवल्यानंतर टीम इंडिया वन डे मालिकेसाठी सज्ज झाली आहे. वर्ल्ड कप स्पर्धेत न्यूझीलंडकडून उपांत्य फेरीत पराभव पत्करावा लागल्यानंतर भारताचा हा पहिलाच वन डे सामना असणार आहे. या सामन्यातून शिखर धवन वन डे संघात पुनरागमन करणार आहे. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. पण, सामन्यापूर्वीच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( बीसीसीआय) दिलेल्या चॅलेंजसमोर धवनची बोबडी वळली... काय आहे हे चॅलेंज.. चला जाणून घेऊया...
India vs West Indies ODI : भारताकडे प्रयोग करण्याची संधी
शिखरनं 130 सामन्यांत 17 शतकं केली आहेत आणि आज तो रोहित शर्मासोबत सलामीला येईल. कर्णधार विराट कोहली मात्र स्वत:च्या पसंतीच्या तिसऱ्या स्थानावरच फलंदाजी करणार आहे. केदार जाधव पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर खेळण्याची शक्यता असून ऋषभ पंत याच्या कामगिरीकडेही विशेष लक्ष असेल. मधल्या फळीसाठी मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्यात चढाओढ असेल. पांडे टी-२० मध्ये अपेक्षित कामगिरी करू न शकल्याने संघ व्यवस्थापनाकडून अय्यरला प्राधान्य मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पण, या सामन्यापूर्वी बीसीसीआयनं धवन व अय्यर यांना 'Speak Out' हे चॅलेंज दिलं. त्यात दोन्ही खेळाडूंना आपापल्या जबड्यात वस्तू ठेवून एकमेकांशी संवाद साधायचा आहे. पाहा दोन्ही खेळाडूंची कशी तारांबळ उडाली ते...
संभाव्य संघ भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.
वेस्टइंडीज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.
पाहा संपूर्ण व्हिडीओ...http://www.bcci.tv/videos/id/7797/speak-out-challenge-feat-shikhar-shreyas