Join us  

India vs West Indies 1st ODI: ना रोहित, ना विराट, ना बुमराह... विंडिज विरूद्धच्या पहिल्या वन-डे साठी असं असेल Playing XI

आजपासून सुरू होणार वन-डे मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2022 2:39 PM

Open in App

India vs West Indies 1st ODI: भारताचा वेस्ट इंडिज दौरा आजपासून सुरू होणार आहे. भारतीय संघ तीन वन डे आणि पाच टी२० सामने खेळणार आहे. दौऱ्याची सुरूवात वन-डे मालिकेने होणार आहे. मालिकेतील पहिला सामना पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे आज होणार आहे. उर्वरित दोन वन डे (२४ आणि २७ जुलै) देखील याच मैदानावर होणार आहेत. या मालिकेसाठी रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, रिषभ पंत, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह यासारख्या बड्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. पाहूया आजच्या सामन्यासाठी कशी असेल प्लेइंग-११...

भारतीय संघासाठी आज एक विशेष गोष्ट घडू शकते. आज रोहित शर्मा, विराट कोहली आणि केएल राहुल तिघेही संघात नाहीत. तसेच रिषभ पंत किंवा दिनेश कार्तिकला देखील विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत इशान किशन संघात असणं जवळपास निश्चित मानलं जात आहे. तसे झाल्यास आज दीर्घ कालावधीनंतर भारताच्या डावात सलामीवीर म्हणून कर्णधार शिखर धवन आणि युवा इशान किशनच्या रुपाने दोन डावखुरे फलंदाज उतरताना दिसू शकतील.

विराट नसल्यामुळे श्रेयस अय्यर तिसऱ्या तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. त्यानंतर दीपक हुडा, रविंद्र जाडेजा आणि शार्दूल ठाकूर हे तीन अष्टपैलू खेळाडू संघाची बांधणी मजबूत करू शकतील. तर फिरकी गोलंदाजीची धुरा युजवेंद्र चहल सांभाळेल. युवा खेळाडूंना संधी देण्याच्या उद्देशाने या मालिकेतील खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांमध्ये आवेश खान, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद सिराज यांना संधी दिली जाऊ शकते.

टीम इंडियाची प्लेइंग-११ असं असू शकतं-शिखर धवन, इशान किशन, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, रविंद्र जाडेजा, शार्दूल ठाकूर, आवेश खान, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, युजवेंद्र चहल

भारत विंडीज वन-डे मालिका

२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)

वन डे मालिकेसाठी भारताचा एकूण संघ- शिखर धवन (कर्णधार), रवींद्र जडेजा (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, शुबमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दूल ठाकूर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज आणि अर्शदीप सिंग.

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजरोहित शर्माविराट कोहलीशिखर धवन
Open in App