गयाना : भारतीय संघाने तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यातही वेस्ट इंडिजवर विजय मिळवत मालिका 3-0 अशी सहज खिशात घातली. ट्वेंटी-२० मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ आजपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. विश्वचषकात न्यूझीलंडकडून उपांत्य सामन्यात पराभूत झाल्यानंतर वन डेत भारताचा हा पहिलाच सामना असेल.
विश्वचषकात तसेच भारतीय संघ वेस्ट इंडिज विरुद्ध दोन ट्वेंटी- 20 सामने खेळण्यासाठी अमेरिकेला रवाना झाला होता. त्यानंतर तिसऱ्या ट्वेंटी- 20 सामन्यासाठी गयाना येथे रवाना झाला. या प्रवासा दरम्यान अनुष्का देखील टीम इंडियाच्या संघासोबत विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा देखील सामील झाल्याचे दिसुन आले.
तसेच ट्वेंटी- 20 मालिका जिंकल्यानंतर विराट पत्नीसोबत वेळ घालवताना दिसतो आहे. त्यातच बुधवारी विराट व अनुष्का जॉर्जटाउनला लंच डेटला गेले होते. यामध्ये भारताचा वेगवान क्रिकेटपटू खलील अहमद देखील सामील झाल्याचे दिसून आले.
ट्वेंटी-२० मालिकेत क्लीन स्वीप केल्यानंतर भारतीय संघ आजपासून वेस्ट इंडिजविरुद्ध वन-डे मालिका खेळणार आहे. जखमी शिखर धवन याचे संघात पुनरागमन झाल्यामुळे लोकेश राहुल चौथ्या स्थानावर खेळण्याची शक्यता आहे. भारताकडून १३० सामन्यात १७ शतके ठोकणारा शिखर रोहित शर्मासोबत सलामीला येईल. कर्णधार विराट कोहली मात्र स्वत:च्या पसंतीच्या तिसऱ्या स्थानावरच फलंदाजी करणार आहे. केदार जाधव पाचव्या किंवा सहाव्या स्थानावर खेळण्याची शक्यता असून ऋषभ पंत याच्या कामगिरीकडेही विशेष लक्ष असेल. मधल्या फळीसाठी मनीष पांडे आणि श्रेयस अय्यर यांच्यात चढाओढ असेल.
संभाव्य संघ भारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, कुलदीपयादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.
वेस्टइंडीज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अॅलन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.