Join us  

India vs West Indies 1st T20 : भारत-विंडीज सामन्यात पावसाचा खोडा, काय सांगतो हवामानाचा अंदाज?

वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 10:53 AM

Open in App

फ्लोरिडा, भारत वि. वेस्ट इंडिजः वर्ल्ड कप स्पर्धेनंतर भारत आणि वेस्ट इंडिज हे दोन्ही संघ पहिल्यांदा पुन्हा मैदानावर उतरणार आहेत. विंडीज दौऱ्यावर दाखल झालेल्या भारताच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि दोन कसोटी सामने होणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात आजपासून होणार आहे. येथे पहिला ट्वेंटी-20 सामना आज खेळवण्यात येणार आहे.

भारतापुढे अखेर आव्हान असेल ते मधल्या फळीचे अपयश संपविण्याचेच. पांडे आणि अय्यर यांना आपल्या कामगिरीद्वारे ही डोकेदुखी संपवावी लागणार आहे. फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदर, वेगवान गोलंदाज खलील अहमद, दीपक चाहर, नवदीप सैनी तसेच दीपकचा भाऊ राहुल चाहर हे देखील संघात आहेत. रोहित शर्मा शिखरसोबत डावाची सुरुवात करणार असून लोकेश राहुल चौथ्या स्थानावर खेळेल. या दौºयात ऋषभ पंतवर अधिक जबाबदारी असेल. तो पहिला यष्टिरक्षक म्हणून येथे आला आहे.

येथील हवामान खात्याच्या माहितीनुसार सामना सुरु होण्याच्या अर्धा तास आधी पावसाची शक्यता आहे. तेथील स्थानिक वेळेनुसार हा सामना सकाळी 10.30 वाजता ( भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता) हा सामना सुरु होणार आहे. हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार दुपारी 1 ते 3 या वेळेतही पावसाची शक्यता आहे. या संपूर्ण सामन्यात 95 टक्के वेळ ढगाळ वातावरण राहणार आहे. अशात षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते.   जाणून घेऊया या दौऱ्याचे संपूर्ण वेळापत्रकट्वेंटी-20 मालिका3 ऑगस्ट, पहिला सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून 4 ऑगस्ट, दुसरा सामना, फोर्ट लॉडेरहील, फ्लॉरिडा, रात्री 8 वा.पासून6 ऑगस्ट, तिसरा सामना, प्रोव्हीडन्स स्टेडियम, गयाना, रात्री 8 वा. पासून 

संभाव्य संघट्वेंटी-20 साठी वेस्ट इंडिजचा संघ : जॉन कॅम्बेल, एव्हीन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पुरन, किरॉन पोलार्ड, पोव्हमॅन पॉव्हेल, कार्लोस ब्रॅथवेट ( कर्णधार), किमो पॉल, सुनील नरीन, शेल्डन कोट्रेल, ओशाने थॉमस, अँथोनी ब्रॅम्बले, जेसन मोहम्मद, खॅरी पिएरे. 

टी-20साठी भारतीय संघ  -  विराट कोहली (कर्णधार) रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक), कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा,  वॉशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार,  खलील अहमद, दीपक चहर, नवदीप सैनी 

टॅग्स :भारत विरुद्ध वेस्ट इंडिजविराट कोहलीबीसीसीआय