अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने रविवारी यजमान वेस्ट इंडिजवर 318 धावांनी विजय मिळवून कसोटी मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारताच्या 419 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजचा संपूर्ण संघ 100 धावांत माघारी परतला. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा आणि अजिंक्य रहाणेची दमदार खेळी याला या विजयाचे श्रेय जाते. या निकालासह भारताने परदेशातील सर्वात मोठ्या विजयाची नोंद केली. यापूर्वी 2017मध्ये गॅले कसोटीत भारताने श्रीलंकेवर 304 धावांनी मात केली होती. विशेष म्हणजे भारताने कसोटी क्रिकेटमध्ये मिळवलेल्या सर्वात मोठ्या ( धावांच्या फरकाने) अव्वल पाचपैकी चार विजय हे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवले आहेत.
कोहली ठरला 'दादा' कर्णधार; गांगुलीला मागे टाकलं अन् धोनीशी केली बरोबरी
जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यासमोर वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी सपशेल शरणागती पत्करली. उप कर्णधार अजिंक्य रहाणेची ( 102) शतकी खेळी आणि हनुमा विहारी ( 93) व कर्णधार विराट कोहली ( 51) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने 419 धावांचे आव्हान उभे केले. 420 धावांचे लक्ष्य पाहूनच वेस्ट इंडिज संघाचे धाबे दणाणले होते, त्या बुमराहने त्यांना हतबल केले. बुमराहने अवघ्या 7 धावा देत विंडीजचा निम्मा संघ माघारी पाठवला. त्यानंतर इशांत शर्मा व मोहम्मद शमी यांनी विंडीजचा डाव 100 धावांत गुंडाळण्यात हातभार लावला. भारताने 318 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.
कसोटी सामन्यात भारताने धावांच्या फरकाने मिळवलेल्या मोठ्या विजयात दक्षिण आफ्रिकेविरुद्धची लढत अव्वल स्थानी आहे. दिल्लीत 2015मध्ये झालेल्या कसोटीत भारताने 337 धावांनी आफ्रिकेला नमवले होते. त्यानंतर इंदौर कसोटीत 2016मध्ये न्यूझीलंडला 321, मोहाली कसोटीत 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाला 320 धावांनी हार मानण्यास भाग पाडले होते. परदेशात भारताने रविवारी मिळवलेला विजय हा सर्वात मोठ्या फरकाचा विजय ठरला. तत्पूर्वी 2017मध्ये श्रीलंकेला 304 धावांनी त्यांच्याच घरी टीम इंडियाने पराभूत केले होते. या अव्वल पाच विजयापैकी 2008ची कसोटी वगळल्यास चार विजय हे कोहलीच्या नेतृत्वाखाली मिळवलेले आहेत.
बूम बूम बुमराह; भारतीय गोलंदाजाचा विश्वविक्रम, कोणलाही जमला नाही असा पराक्रम
वेस्ट इंडिज दारूण पराभव; भारताने 100 वर केले ऑलआऊट