India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2019 09:42 AM2019-08-22T09:42:46+5:302019-08-22T09:44:52+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies, 1st Test : India Predicted XI against West Indies - Virat Kohli to make tough call between Rohit Sharma and Ajinkya Rahane | India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!

India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : ट्वेंटी-20 आणि वन डे मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवल्यानंतर टीम इंडिया कसोटी मालिकेसाठी सज्ज झाली आहे. कसोटी क्रिकेटला जीवंत ठेवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची घोषणा केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसोटीचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे. आजच्या सामन्यात कॅप्टन विराट कोहली कोणत्या शिलेदारांसह मैदानावर उतरणार आहेत, ते पाहूया...


पाचव्या क्रमांकाचा फलंदाज हे विराट कोहली आणि संघ व्यवस्थापनासमोरील मोठं आव्हान आहे. उपकर्णधार अजिंक्य रहाणे सध्या फॉर्मात नाही आणि अशा परिस्थितीत रोहित शर्माच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो.   
 

असा असेल संघ

मयांक अग्रवाल

मेलबर्न कसोटीतून मयांक अग्रवालने टीम इंडियात एन्ट्री केली आणि आपल्या कामगिरीनं त्यानं सर्वांना प्रभावित केले. त्याने ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने खेळले आणि त्यानंतर भारत A संघाचे प्रतिनिधित्व करताना वेस्ट इंडिज दौऱ्यात सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. 

हनुमा विराही 
मेलबर्न कसोटीत सलामीला मिळालेल्या संधीचं सोनं केलं. मधल्या फळीतील सक्षम पर्याय म्हणून त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. पण, वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटीत संघ व्यवस्थापन त्याचा सलामीवीर म्हणून विचार करू शकतात.  

चेतेश्वर पुजारा
टेस्ट स्पेशालिस्ट चेतेश्वर पुजारा संघात नसेल तर सर्वांना आश्चर्य वाटेल. सराव सामन्यात त्यानं शतकी खेळी करून त्याचे महत्त्व काय आहे, हे दाखवून दिले आहे. 

विराट कोहली ( कर्णधार ) 
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा म्हणजेच कसोटी वर्ल्ड कप स्पर्धेचा सुरुवातीचा सामना आणि विराट कोहलीच्या बॅटीतून धावांचा पाऊस पडताना पाहायला सर्व आतुर आहेत. वन डे मालिकेत विराटने त्याची झलक दाखवली आहेच.  

अजिंक्य रहाणे
वेस्ट इंडिज दौऱ्याला रवाना होण्यापूर्वी कर्णधार विराट कोहलीनं अजिंक्य रहाणेचे महत्त्व पटवून सांगितले होते. त्यात सराव सामन्यात रहाणेने अर्धशतकी खेळी करून फॉर्मात परतण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं आहे. शिवाय त्याच्या उपस्थितीनं कोहलीला रणनीती ठरवण्यातही फार मदत मिळणार आहे.

रिषभ पंत
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये आक्रमक खेळी करणाऱ्या रिषभ पंतची खरी कसोटी आता लागणार आहे. इंग्लंड दौऱ्यात त्यानं कसोटीत शतक झळकावलं होतं आणि ऑस्ट्रेलियातही दमदार कामगिरी केली होती. पण, वेस्ट इंडिज दौऱ्यात टेस्ट स्पेशालिस्ट वृद्धीमान सहाचे संघात पुनरागमन झाल्याने पंतला संधी मिळेल की नाही, याबाबत साशंकता होती. पण, आजच्या सामन्यात पंतच बाजी मारणार, असे सध्या चित्र दिसत आहे.
 


रवीचंद्रन अश्विन 
भारतीय कसोटी संघाचा स्पेशालिस्ट फिरकीपटू आर अश्विन संघात पुनरागमन करणार आहे आणि अष्टपैलू म्हणून त्याच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याची कामगिरी उल्लेखनीय झालेली आहे.  

इशांत शर्मा
आजच्या सामन्यात विराट कोहली चार जलदगती गोलंदाजांसह मैदानावर उतरणार आणि त्यांचे नेतृत्व इशांत शर्माच्या खांद्यावर असणआर आहे.  

उमेश यादव
विदर्भच्या उमेश यादवने सराव सामन्यात साजेशी कामगिरी केली आहे. त्यानं या सामन्यात तीन विकेट्स घेताना सातत्याने अचूक मारा केला आहे.

मोहम्मद शमी  
कोणत्याही खेळपट्टीवर सातत्याने अचुक मारा करण्याची कला मोहम्मद शमीकडे आहे.  

जसप्रीत बुमराह  
जगातील सर्वोत्तम गोलंदाज असलेला जसप्रीत बुमराह विश्रांतीनंतर पुन्ही टीम इंडियात परतणार आहे. 

भारताचं 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' उद्यापासून; जाणून घ्या कसे अन् किती मिळणार गुण!

रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे यांच्यामुळे संघ बळकट होईल

नव्या जर्सीबद्दल काय सांगतायत भारतीय खेळाडू, पाहा व्हिडीओ

Web Title: India vs West Indies, 1st Test : India Predicted XI against West Indies - Virat Kohli to make tough call between Rohit Sharma and Ajinkya Rahane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.