India vs West Indies 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी उद्यापासून सुरू होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ या टप्प्यातील भारतीय संघाची ही पहिलीच मालिका आहे. भारतीय संघ येथे २ कसोटी, ३ वन डे आणि ५ ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. पण, भारतीय खेळाडूंना इथे मैदानावर पोहोचण्यासाठी बराच प्रवास करावा लागत आहे आणि क्रिकेट वेस्ट इंडिजच्या व्यवस्थेवर BCCI नाराज असल्याचे वृत्त आहे.
पहिल्या कसोटीपूर्वी गोंधळ झालेला पाहायला मिळतोय... क्रिकेट वेस्ट इंडिजने भारतीय खेळाडूंची व्यवस्था सराव मैदानापासून दूर केली आहे. त्यामुळे खेळाडूंचा तासभर वेळ प्रवासात जात आहे. भारतीय संघ येथे Intercontinental Hotelमध्ये थांबला आहे आणि त्यांना जेथे सामना होणार आहे तिथे पोहोचण्यासाठी एक तास प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे कसोटी सामन्याच्या दिवशीही त्यांचा दोन-अडीच तास वेळ प्रवासात जाणार आहे आणि त्यावरून खेळाडू नाराज आहेत.
भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे ( उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रेथवेट ( कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड ( उप कर्णधार), एलिक एथानाझे, तागेनरीन चंद्रपॉल, रहकिम कोर्नवॉल, जोशूआ सिल्वा, शेनॉन गॅब्रीएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेंझी, रेयमन रेइफेर, केमार रोच, जोमेल वॉरिकन.