नॉर्थ साऊंड: वेस्ट इंडिज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या दूसऱ्या डावात भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने शतक झळकावत भारताला भक्कम स्थितीत आणले आहे. रहाणेचे कसोटी क्रिकेटमधील हे 10वे शतक होते. तसेच शतक पूर्ण केल्यानंतर रहाणे भावूक झाल्याचे दिसून आले.
रहाणे शतक झळकविल्यानंतर गॅब्रिलच्या गोलंदाजीवर आउट झाला. त्याने 242 चेंडूत 102 धावा केल्या. तत्पूर्वी या मालिकेपूर्वी रहाणेला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नव्हती. पण, कसोटीच्या पहिल्या डावात त्यानं 81 धावा करताना संघाला 297 धावांचा डोंगर उभा करून दिला. दुसऱ्या डावातही रहाणेच्या खेळीत सातत्य पाहायला मिळाले.
सामनाच्या चौथ्या दिवसाच्या सुरुवातीलाच विराट कोहली 51 धावांवर बाद झाला होता. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या हनुमा विहारीनं अजिंक्य रहाणेसोबत भारताचा डाव पुढे नेला. रहाणे आणि विहारी यांनी केलेल्या पाचव्या विकेटसाठी शतकी भागिदारीच्या जोरावर भारताने सध्या 404 धावांनी आघाडी घेतली आहे.