india vs west indies 2023 schedule : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकेला १२ जुलैपासून सुरूवात होत आहे. भारताकडून सलामीच्या सामन्यातून यष्टीरक्षक इशान किशन आणि वेगवान गोलंदाज मुकेश कुमार पदार्पण करण्याची शक्यता आहे. याशिवाय सलामीवीर यशस्वी जैस्वाल देखील पदार्पण करणार असल्याचे मानले जात आहे. भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर असून तिथे कसोटी आणि वन डे मालिका खेळणार आहे. भारतीय संघात आगामी मालिकेसाठी यशस्वी जैस्वाल आणि ऋतुराज गायकवाड या युवा शिलेदारांना संधी मिळाली आहे.
रोहितसोबत जैस्वाल असणार सलामीवीर?वेस्ट इंडिजविरूद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कर्णधार रोहितसोबत सलामीवीर म्हणून यशस्वी जैस्वाल दिसू शकतो. सराव सामन्यांमध्ये यशस्वीने शानदार कामगिरी केली आहे. त्यामुळे जैस्वालचे पदार्पण निश्चित मानले जात आहे.
इशान किशनला संधी मिळण्याची शक्यताऑस्ट्रेलियाविरूद्ध मायदेशात खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये केएस भरतने पदार्पण केले होते. त्याला ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही संधी मिळाली होती. पण भरत आतापर्यंत फलंदाजीत फ्लॉप ठरला आहे. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून इशान किशनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. लक्षणीय बाब म्हणजे मोहम्मद शमीच्या गैरहजेरीत मुकेश कुमार पदार्पण करू शकतो.
पहिल्या सामन्यासाठी संभावित भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, इशान किशन (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकुर, मुकेश कुमार आणि मोहम्मद सिराज.
वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ -रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे (उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- पहिली कसोटी- १२ ते १६ जुलै, डॉमिनिका (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)
- दुसरी कसोटी - २० ते २४ जुलै, त्रिनिदाद, (वेळ सायंकाळी ७.३० वाजल्यापासून)