अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजःअजिंक्य रहाणेपाठोपाठ अष्टपैलू रवींद्र जडेजाने अर्धशतक झळकावल्यामुळे भारताला पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात 297 धावा करता आल्या.
भारताने आजच्या दिवसाला 6 बाद 203 या धावसंख्येवरून सुरुवात केली. भारताला यावेळी रिषभ पंतकडून मोठ्या अपेक्षा होत्या. पण पंतला (24) आज फक्त चार धावांचीच भर घालता आली. त्यावेळी भारताची 7 बाद 207 अशी अवस्था झाली होती. पण यावेळी संघासाठी धावून आला तो जडेजा.
इशांत शर्माला साथीला घेत जडेजाने आठव्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमध्ये इशांतने 19 धावा केल्या. जडेजाने यावेळी भारताचा किल्ला लढवत 6 चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 58 धावांची खेळी साकारली. जडेजाच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताला 297 धावा करता आल्या.