अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला उपांत्य फेरीत माघारी फिरावे लागले असते तरी या स्पर्धेत रोहित शर्माने आपला दम दाखवला. त्याने पाच सामन्यांत शतकी खेळी केल्या. पण, याच रोहितला वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळवावे की नाही, यावर चर्चा सुरू आहे. भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीनं हिटमॅन रोहितसाठी बॅटींग केली आहे. वन डे व ट्वेंटी-20 प्रमाणे रोहित कसोटीतही सलामीला येऊ शकतो, असा दावा गांगुलीनं केला आहे.
India vs West Indies, 1st Test : टीम इंडिया 'कसोटी वर्ल्ड कप'चे दावेदार, आज उतरवणार 'हे' शिलेदार!
उपकर्णधार अजिंक्य रहाणे मधल्या फळीत स्थैर्य आणू शकतो, असेही गांगुलीने सांगितले. '' वर्ल्ड कप स्पर्धेत रोहितने दमदार कामगिरी केली. त्याचा हा फॉर्म कायम राखण्यासाठी त्याला कसोटीतही संधी द्या आणि त्याला सलामीला खेळूद्या, तर रहाणे मधली फळीला भक्कम करू शकतो,'' असे गांगुलीनं टाईम्स ऑफ इंडियात लिहिलेल्या कॉलममध्ये म्हटले आहे.
रोहित शर्मा - अजिंक्य रहाणे यांच्यामुळे संघ बळकट होईल
नव्या जर्सीबद्दल काय सांगतायत भारतीय खेळाडू, पाहा व्हिडीओ
भारतीय संघाची वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका आजपासून सुरू होत आहे. यापूर्वी झालेल्या तीन दिवसांच्या सराव सामन्यात भारताने वर्चस्व राखले. सराव सामन्यात काही खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष होते. त्यानुसार चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, ईशांत शर्मा, उमेश यादव यांनी चमक दाखवून कसोटी मालिकेसाठी सज्ज असल्याचे संकेत दिले. त्यामुळे मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर विव्हियन रिचर्ड्स स्टेडियमवर हा सामना होणार असूत येथील खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पूरक मानली जाते. त्यामुळे कर्णधार विराट कोहली चार स्पेशालिस्ट फार्स्ट गोलंदाजांसह मैदानावर उतरणार आहे.
विंडीजला धक्का; 'गब्बर'ची विकेट घेणाऱ्या गोलंदाजाची पहिल्या कसोटीतून माघार
कोहली, पंत, बुमराह यांना इतिहास घडवण्याची संधी; खुणावतायत सात विक्रम
टीम इंडियाचा 'मिशन टेस्ट वर्ल्ड कप' आजपासून, जाणून घ्या सामना कधी व कोठे?
भारताने हा सामना जिंकल्यास कर्णधार म्हणून कोहलीचा 27 वा कसोटी विजय ठरेल आणि तो धोनीची बरोबरी करेल. या सामन्यात विराटने शतक ठोकल्यास कर्णधार म्हणून 19 व्या शतकासह तो रिकी पॉंटिंगच्या विक्रमाशीही बरोबरी करेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील कसोटी मालिकाही जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेंतर्गत होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ कसोटीचा वर्ल्ड कप जिंकण्याच्या निर्धारानेच मैदानावर उतरणार आहे.