अँटिग्वा, भारत विरुद्ध वेस्ट इंडिजः भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर हे विराट कोहलीवर चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारी सुरुवात झाली. यावेळी समालोचन करताना गावस्कर यांनी कोहलीवर तोफ डागली.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात कोहलीला फक्त 9 धावा करता आल्या. यावेळी एका उसळत्या चेंडूवर कोहली बाद झाला. सामना सुरु होण्यापूर्वी कोहलीने मला मैदानात आल्यावर लगेचच बाऊन्सर टाका, असे सांगितले होते. पण यावेळी उसळत्या चेंडूवरच तो बाद झाल्याचे पाहायला मिळाले.
समालोचन करताना गावस्कर कोहलीवर आणि रवी शास्त्री यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण केले. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला, त्यावर गावस्कर रागावलेले पाहायला मिळाले.
गावस्कर म्हणाले की, " वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या सामन्यासाठी जो भारताचा संघ निवडण्यात आला आहे, ते पाहून मला धक्का बसला आहे. आर. अश्विनचा आतापर्यंत चांगला रेकॉर्ड राहीलेला आहे, त्याचबरोबर वेस्ट इंडिजबरोबर त्याची कामगिरी उजवी राहीलेली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान न देणे, हे धक्कादायक आहे."
अश्विनने वेस्ट इंडिजविरुद्ध 11 कसोटी सामन्यांमध्ये 552 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. त्याचबरोबर 60 बळीही मिळवले आहे. त्यामुळे एवढी जबरदस्त कामगिरी असताना अश्विनला संघाबाहेर ठेवणे गावस्कर यांना पटलेले दिसत नाही.
बाऊन्सरला घाबरत नाही म्हणणारा कोहली उसळत्या चेंडूवरच आऊट झाला फलंदाजीला गेल्यावर लगेचच मला बाऊन्सर टाका, असं विधान करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली तोंडघशी पडला आहे. कारण वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात कोहली उसळत्या चेंडूवरच आऊट झाल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर यावेळी काही बाऊन्सर्सचा समर्थपणे सामना कोहलीला करता न आल्याचेच पाहायला मिळाले.
कोहलीने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 9 धावा केल्या, यामध्ये दोन चौकारांचा समावेश होता. कोहली आता आक्रमकपणे फलंदाजी करणार, असे वाटत असताना कोहली वेगवान गोलंदाज शेनॉन गॅब्रियलच्या गोलंदाजीवर आऊट झाला. गॅब्रियलने एक उसळता चेंडू कोहलीच्या ऑफ स्टम्पच्या दिशेने टाकला. कोहली हा चेंडू मारण्यासाठी गेला आणि त्याचा झेल गलीमध्ये उभ्या असलेल्या ब्रुक्सने पकडला. बाद होण्यापूर्वी कोहलीला काही बाऊन्सर्स टाकण्यात आले. यावेळी कोहलीला या बाऊन्सर्सचा सामना कोहलीला समर्थपणे करता आला नसल्याचेच पाहायला मिळाले.
फलंदाजीला गेल्यावर मला बाऊन्सरचा झटका बसावा, कोहलीचं अजब विधानअॅशेस मालिकेतील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्हन स्मिथला बाऊन्सर लागला आणि तो मैदानातच कोसळला. ही दुखापत एवढी गंभीर होती की, त्यानंतर स्मिथला मैदानात येता आले नाही. तिसऱ्या कसोटी सामन्यालाही स्मिथला मुकावे लागले. पण आता भारताचा कर्णधार विराट कोहलीने एक अजब विधान केले आहे. ' फलंदाजीला गेल्यावर लगेचच मला बाऊन्सरचा झटका बसावा, ' असे विधान कोहलीने केले आहे.