India vs West Indies 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली कसोटी उद्यापासून सुरू होत आहे. BCCI ने या दौऱ्यासाठी निवडलेल्या कसोटी संघात यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार आदी युवा खेळाडूंना संधी दिली आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ या टप्प्यातील भारतीय संघाची ही पहिलीच मालिका आहे आणि भविष्याच्या दिशेने युवा खेळाडूंना संधी देण्याची हीच योग्य वेळ आहे. त्यामुळे विंडीजविरुद्धच्या २ कसोटी मालिकेत यशस्वी व इशान किशन यांना पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता अधिक आहे. या मालिकेसाठी भारतीय संघातील खेळाडू नव्या जर्सीत दिसले आणि त्यावरून नेटिझन्स नाराज झाले आहेत.
भिड बिनधास्त! यशस्वी जैस्वालला उप कर्णधार अजिंक्य रहाणेचा सल्ला; मुंबईकराचे पदार्पण पक्के
जागतिक कसोटी अजिंक्यपद २०२३ च्या फायनलमध्ये भारतीय संघ स्पॉन्सरशिवाय मैदानावर उतरला होता आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या कसोटीत टीम इंडियाच्या जर्सीच्या पुढील बाजूला India हे ठळकपणे लिहिले होते आणि ही जर्सी सर्वांच्या पसंतीत उतरली होती. पण, विंडीज मालिकेपूर्वी BCCI ला स्पॉन्सर मिळाला आणि India च्या जागी आता Dram11 दिसत आहे. हे पाहून चाहते नाराज झाले आहेत.
वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रेथवेट ( कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड ( उप कर्णधार), एलिक एथानाझे, तागेनरीन चंद्रपॉल, रहकिम कोर्नवॉल, जोशूआ सिल्वा, शेनॉन गॅब्रीएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेंझी, रेयमन रेइफेर, केमार रोच, जोमेल वॉरिकन.