India vs West Indies 1st Test : पत्रकार रोहित शर्मा! पहिल्या कसोटीपूर्वी 'हिटमॅन'ची अजिंक्य रहाणेवर प्रश्नांची सरबत्ती, Video

India vs West Indies 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटीला बुधवारपासून सुरूवात होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2023 11:05 AM2023-07-11T11:05:38+5:302023-07-11T11:06:53+5:30

whatsapp join usJoin us
India vs West Indies 1st Test :  When Team India Captain Rohit Sharma turned reporter in Vice-Captain ajinkya rahane's press conference,Video  | India vs West Indies 1st Test : पत्रकार रोहित शर्मा! पहिल्या कसोटीपूर्वी 'हिटमॅन'ची अजिंक्य रहाणेवर प्रश्नांची सरबत्ती, Video

India vs West Indies 1st Test : पत्रकार रोहित शर्मा! पहिल्या कसोटीपूर्वी 'हिटमॅन'ची अजिंक्य रहाणेवर प्रश्नांची सरबत्ती, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs West Indies 1st Test : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या पहिल्या कसोटीला बुधवारपासून सुरूवात होत आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२३-२५ या टप्प्यातील भारताची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. युवा आणि अनुभवी खेळाडूंची फौज घेऊन भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर दाखल झाला आहे. अजिंक्य रहाणेने १८ महिन्यानंतर भारतीय संघात स्थान मिळवताना पुन्हा उप कर्णधारपद मिळवले आहे. त्यामुळे त्याच्यावर युवा खेळाडूंना सोबत घेऊन भारताला विजय मिळवून देण्याची जबाबदारी असणार आहे. चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत मधल्या फळीची भीस्त ही अजिंक्यवरच आहे. पहिल्या कसोटीपूर्वी अजिंक्यने येथे पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि यावेळी कर्णधार रोहित शर्माही ( Rohit Sharma) पत्रकाराच्या भूमिकेत गेला अन् त्याने अजिंक्यला मजेशीर प्रश्न विचारले.


BCCI ने आज एक व्हिडीओ पोस्ट केला, ज्यात अजिंक्य पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देतोय अन् रोहित पत्रकारांच्या बाजूला उभा आहे. यावेळी एका प्रश्नावर अजिंक्य म्हणाला, इस एज में मतलब? मै अभी भी यंग हू यार! यावर रोहितला हसू आवरलं नाही. 

 

  • रोहित शर्मा - वेस्ट इंडिजमध्ये तू अनेकदा आला आहेस, इथे रन केले आहेत. जे नवीन खेळाडू आहेत त्यांना तू काय सांगशील?
  • अजिंक्य रहाणे - फलंदाज म्हणून इथे संयम बाळगणे अत्यंत महत्त्वाचे.
  • रोहित शर्मा - इकडचे वातावरण खूप अल्हादायक आहे, ५ नंतर काय करायला हवं?
  • अजिंक्य रहाणे - ज्या देशात खेळायला जातो, तिथे जुळवून घेतलं पाहिजे. सर्व फोकस हे मैदानावर अन् खेळावरच असायला हवं...

 

या प्रश्नानंतर जोरदार पाऊस सुरू झाला अन् रोहित लगेच म्हणाला आता तरी मैदानाबाहेर पळायला हवं... 

  • भारताचा कसोटी संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, अजिंक्य रहाणे ( उप कर्णधार), केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी. 
  • वेस्ट इंडिजचा संघ - क्रेग ब्रेथवेट ( कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड ( उप कर्णधार), एलिक एथानाझे, तागेनरीन चंद्रपॉल, रहकिम कोर्नवॉल, जोशूआ सिल्वा, शेनॉन गॅब्रीएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेंझी, रेयमन रेइफेर, केमार रोच, जोमेल वॉरिकन.  

Web Title: India vs West Indies 1st Test :  When Team India Captain Rohit Sharma turned reporter in Vice-Captain ajinkya rahane's press conference,Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.