किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : दुसऱ्या दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंतची विकेट गेली आणि भारताला धक्का बसला. भारताला पंतकडून फार मोठ्या अपेक्षा होत्या. पण पंतला आजच्या दिवशी फक्त एकच चेंडू खेळता आला.
पंत आणि हनुमा विहारी हे आजच्या दिवसाची कशी सुरुवात करतात, हे पाहणे उत्सुकतेचे होते. ही जोडी भारताला मोठी धावसंख्या उभारून देइल, अशी चाहत्यांना आशा होती. पण पंतने पहिल्याच चेंडूवर आपली विकेट बहाल करत चाहत्यांना नाराज केले.
या सामन्याचा पहिलाच चेंडू जेसन होल्टरने टाकला. या चेंडूवर पंत फसला आणि तो त्रिफळाचीत झाला. पंतला या सामन्यात २७ धावा करता आल्या. गेल्या काही सामन्यांमध्ये पंत अपयशी ठरताना दिसत आहे. त्यामुळे यापुढेही त्याला संधी मिळत राहणार का, असा सवाल चाहते विचारत आहेत.
जे गेल्या ५० वर्षांत गोलंदाजांना जमले नाही ते आज घडले...
आतापर्यंत क्रिकेट विश्वात जे एकाही गोलंदाजाला घडले नाही ते आज घडल्याचे पाहायला मिळाले आहे. आतापर्यंत क्रिकेट जगताने बरेच महान गोलंदाज पाहिले. पण जे या महान गोलंदाजांना आतापर्यंत जमले नाही ते आज घडल्याचे पाहायला मिळाले.
वेस्ट इंडिजचे महान फलंदाज आणि समालोचक सर विव रीचर्ड्स हे गोलंदाजांचे कर्दनकाळ समजले जायचे. सर विव रीचर्ड्स हे मैदानात जेव्हा उतरायचे तेव्हा गोलंदाजांना धडकी भरायची. आता सर विव रीचर्ड्स कधी आऊट होणार, हे टेंशन त्याच्या चेहऱ्यावर दिसायचे. पण जे या गोलंदाजांना करता आले नाही ते आज घडले आहे. सर विव रीचर्ड्स यांनीच ही गोष्ट सांगितली आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला शुक्रवारी सबिना पार्क येथे सुरुवात झाली. पण हा सामना सुरु होण्यापूर्वीच वेस्ट इंडिजचे महान फलंदाज आणि समालोचक सर विव रीचर्ड्स कोसळले. त्यानंतर लगेचच त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सर रीचर्ड्स यांना समालोचन करताना भोवळ आली होती.
सामना सुरु होण्यापूर्वी सर रीचर्ड्स हे समालोचन करण्यासाठी मैदानात उभे होते. यावेळी त्याची प्रकृती ढासळली आणि त्यांना त्यांना स्वयंसेवकांच्या मदतीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
यानंतर सर रीचर्ड्स यांनी सांगितले की, " क्रिकेट विश्वातील चाहत्यांना मी सांगू इच्छितो की, मी पूर्णपणे फिट आहे. मी सध्या पूर्णपणे बरा झालो असून आता समालोचन करत आहे. आतापर्यंत एकाही गोलंदाजाला जे जमले नाही ते नैसर्गीकरीत्या घडले." सर रीचर्ड्स हे कधीही वेगवान गोलंदाजाच्या बाऊन्सरचा शिकार झाले नव्हते. त्यामुळे त्यांनी असे वक्तव्य केल्याचे म्हटले जात आहे.
Web Title: India vs West Indies, 2 nd test: Rishabh Pant's wicket on the first ball of the day
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.