India vs West Indies Schedule : प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीत शिखर धवनच्या ( Shikhar Dhawan) नेतृत्वाखाली भारतीय संघ उद्यापासून वेस्ट इंडिजला वन डे मालिकेत भिडणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली नुकत्याच पार पडलेल्या इंग्लंडविरुद्धच्या वन डे मालिकेत भारताने २-१ असा ऐतिहासिक विजय मिळवला. यजमान वेस्ट इंडिजचा फॉर्म पाहता भारतीय संघाला ही वन डे मालिका जिंकणे फार अवघड जाणार नाही. या मालिकेत भारताला राखीव फळीचा योग्य उपयोग करून घेण्याची संधी आहे. ऋतुराज गायकवाड, श्रेसय अय्यर, दीपक हुडा, संजू सॅमसन आदी युवा खेळाडूंवर लक्ष असणार आहे.
२००९ पासून भारतीय संघ वन डे मालिकेत विंडीजविरुद्ध त्यांच्या घरच्या मैदानावर अपराजित आहे. २००९मध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली २-१ असा विजय, २०११मध्ये सुरेश रैनाच्या कर्णधारपदाखाली ३-२ असा विजय, २०१७ व २०१९ मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अनुक्रमे ३-१ व २-० असा विजय टीम इंडियाने मिळवला आहे. आतापर्यंत उभय संघांमध्ये झालेल्या १३६ वन डे सामन्यांत जय-पराजयाची आकडेवारी ही ६७-६३ अशी भारताच्या बाजूने आहे.
वेस्ट इंडिजचा वन डे संघ - निकोलस पूरन ( कर्णधार) शे होप, शॅमर्ह ब्रुक्स, किसी कार्टी, जेसन होल्डर, अकिल होसैन, अल्झारी जोसेफ, ब्रेंडन किंग, कायले मेयर्स, गुदाकेश मोटी, किमो पॉल, रोव्हमन पॉवेल, जयडेन सील्स
वेस्टइंडिज दौऱ्याचे वेळापत्रक
वन डे मालिका-२२ जुलै - पहिली वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२४ जुलै - दुसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन२७ जुलै - तिसरी वन डे - पोर्ट ऑफ स्पेन(सर्व सामने भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता)
थेट प्रक्षेपण - FanCode.com किंवा DD स्पोर्ट्स