भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचा बोलबाला राहिला. राहुलच्या शतकी खेळीनंतर रोहित नावाचं वादळ विशाखापट्टणममध्ये घोंगावलं. रोहितनं तुफान फटकेबाजी करताना 159 खेळी केली. रोहितची घोडदौड 44 व्या षटकात रोखण्यात विंडीजला यश आलं, परंतु त्यानं तोपर्यंत विक्रमांचा पाऊस पाडला होता. रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनीही विंडीज गोलंदाजांना धू धू धुतले. त्यांच्या फटकेबाजीनं भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. आजच्या खेळीनं रोहितनं भारतीय फलंदाजांमधली त्याची हुकूमत कायम राखली.
2019मध्ये वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक अर्धशतकांचा विक्रमही रोहितनं नावावर केला. सरत्या वर्षातील हे त्याचे 12वे अर्धशतक ठरले. त्यानं वेस्ट इंडिजच्या शे होप व टीम इंडियाच्या विराट कोहली यांचा 11 अर्धशतकांचा विक्रम मोडला. रोहितनं त्यानंतर धावांचा वेग वाढवला. त्यानं अर्धशतकाचे शतकात रुपातंर करताना 107 चेंडूंत 100 धावा केल्या. वनडेतील त्याचे हे 28वे शतक ठरलं, तर वेस्ट इंडिजविरुद्धचे तिसरे शतक ठरले. त्यापाठोपाठ राहुलनंही 103 चेंडूंत शतक पूर्ण केले. वन डेतील त्याचे हे तिसरे शतक आहे. पण, 37व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर लोकेश झेलबाद झाला. अल्झारी जोसेफनं त्याला 102 धावांवर माघारी पाठवले.
विशाखापट्टणमवर धावांचा पाऊस पाडणारा कोहली आज पहिल्याच चेंडूवर माघारी परतला. त्यानंतर रोहितची बॅट चांगलीच तळपली. 44व्या षटकात रोहितचा झंझावात थांबला. कोट्रेलनं त्याला बाद केले. रोहितनं 138 चेंडूंत 17 चौकार व 5 षटकारांसह 159 धावा चोपल्या. रोहित माघारी परतल्यानंतर रिषभ पंतनं चोपून काढले. रिषभ 16 चेंडूंत 39 धावा करून माघारी परतला. यासह रिषभ आणि अय्यर यांची 24 चेंडूंतील 73 धावांची भागीदारीही संपुष्टात आली. या जोडीनं रोस्टन चेसच्या एका षटकात 31 धावा चोपून काढल्या. अय्यर 32 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार मारून 53 धावांत माघारी परतला. भारताना 5 बाद 387 धावा चोपल्या.
रोहितची ही खेळी यंदाच्या वर्षात भारतीय फलंदाजानं केलेली सर्वोत्तम खेळी ठरली. त्यानं शिखर धवनचा 143 धावांच्या खेळीला मागे टाकले. रोहितनं 2013 ते 2019 अशी सलग 7 वर्ष वर्षातील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये टॉप स्थान पटकावले आहे.
2013 - रोहित शर्मा ( 209 धावा)
2014 - रोहित शर्मा ( 264 धावा)
2015 - रोहित शर्मा ( 150 धावा)
2016 - रोहित शर्मा ( 171* धावा)
2017 - रोहित शर्मा ( 208* धावा)
2018 - रोहित शर्मा ( 162 धावा)
2019 - रोहित शर्मा ( 159 धावा)
रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इतिहासात कुणालाच जमला नाही हा पराक्रम
रोहित शर्मानं मोडला स्वतःचाच विक्रम, 'हिटमॅन' नावाला साजेशी कामगिरी
रोहित शर्माची बॅट चांगलीच तळपली, विराटसह विंडीजच्या शे होपलाही टाकलं मागे
रोहित शर्मानं मोडला महेंद्रसिंग धोनीचा विक्रम, ठरला अव्वल
रोहितची कर्णधार कोहलीवर कुरघोडी, 2019मध्ये कुणालाच जमली नाही अशी कामगिरी
रिषभ-अय्यर जोडीनं मोडला तेंडुलकर-जडेजाचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम
विराट कोहलीचा 'Golden Duck'; तब्बल 7 वर्षांनी ओढावली नामुष्की
एकट्या रोहित शर्मानं संपूर्ण पाकिस्तान संघाला हरवलं, कसं ते तुम्हीच पाहा
Web Title: India vs West Indies, 2nd ODI: Highest individual score by Indians in ODIs in recent years, Rohit Sharma on top from 2013 till now
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.