पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यांमध्ये आज दुसरा सामना क्विन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे. पण या क्विन्स मैदानावर भारतीय संघच किंग असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या 12 वर्षांमध्ये भारतीय संघ या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. त्याचबरोबर भारताने भारताबाहेर सर्वात जास्त धावसंख्या याच मैदानात रचलेली आहे.
भारताने 2007 साली झालेल्या विश्वचषकात भारत आणि बर्म्युडा यांच्यातील सामना या मैदानात झाला होता. बर्म्युडाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताने या संधीचा चांगलाच फायदा उचलला होता. भारताने बर्म्युडाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 412 धावा केल्या होत्या. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने 114 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर सौरव गांगुली, युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांनी अर्धशतके झळकावली होती.
या मैदानात 23 मार्च 2007 साली भारताला श्रीलंकेडून पराभव पत्करावा लागला होता. हा या मैदानातील भारताचा अखेरचा पराभव होता. कारण यानंतर सात सामने या मैदानात खेळले गेले आणि एकाही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला नाही. त्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून भारतीय संघ या मैदानावर अपराजित आहे. भारताच्या 'या' युवा गोलंदाजाला मिळू शकते संधीभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये आज क्विंस पार्क ओव्हन येथे दुसरा एकदिवसीय सामना रंगणार आहे. या सामन्यावर पावसाचे सावट असल्याचे म्हटले जात आहे. पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. पण जर दुसरा सामना खेळवण्यात आला तर भारताच्या एका युवा वेगवान गोलंदाजाला पदार्पण करण्याची संधी मिळू शकते.
भारतीय संघात दुसऱ्या सामन्यात काही बदल केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यात एका गोलंदाजाला वगळले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे ट्वेन्टी-20 मालिकेत आपली छाप पाडणारा युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीला या सामन्यात पदार्पण करता येईल, असे म्हटले जात आहे.
पहिल्याच ट्वेन्टी-20 सामन्यात सैनीला संधी देण्यात आली होती. या सामन्यात सैनीने तीन विकेट्स मिळवल्या होत्या. त्यानंतरही सैनीकडून सातत्यपूर्ण कामगिरी पाहायला मिळाली. पण सैनीला अजूनही एकदिवसीय सामना खेळता आलेला नाही. पण आज सैनीला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळू शकते, असे म्हटले जात आहे.
भारताचा वेस्ट इंडिज विरुद्धचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने मालिकेतील दुसरा वन डे सामना आज रविवारी पोर्ट ऑफ स्पेन मैदानात रंगणार आहे. तसेच हा सामना जिंकून टीम इंडिया मालिकेत आघाडी घेण्याचा प्रयत्न करेल. मात्र या सामन्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
भारताचा कर्णधार विराट कोहलीने मालिकेतील पहिला वन डे सामना रद्द झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. त्यातच आज रंगणाऱ्या दुसऱ्या वन डे सामन्यात देखील पावसाचे संकट असणार असल्याचे रिपोर्टनूसार समजते आहे.
तसेच सामन्याआधी सराव करताना पावसाने व्यत्यय आणल्याने भारताचा फलंदाज रोहित शर्मा सराव करताना पाऊस आल्याने छत्री घेऊन मैदानाबाहेर जाताना दिसतो आहे.
प्रतिस्पर्धी संघभारत: विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, ऋषभ पंत, रवींद्र्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, केदार जाधव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद आणि नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज: जेसन होल्डर (कर्णधार), ख्रिस गेल, जॉन कॅम्पबेल, एविन लुईस, शाय होप, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, रोस्टन चेज, फॅबियन अॅलेन, कार्लोस ब्रेथवेट, कीमो पॉल, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस आणि केमार रोच.