पोर्ट ऑफ स्पेन, भारत वि. वेस्ट इंडिज : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता दुसऱ्या सामन्यातही पाऊस खोडा घालणार का, याची उत्सुकता साऱ्यांना असेल. दुसऱ्या सामन्याच्या वेळी वातावरण कसे असेल, याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
दुसऱ्या सामन्यापूर्वी जोरदार पाऊस पडला होता. त्यामुळे भारतीय संघाला इनडोअर सराव करावा लागला होता. भारताचा यष्टीरक्षक रिषभ पंत आणि फिरकीपटू कुलदीप यांनी तर हॉटेलमध्ये पीच बनवून खास सराव केला होता. यावेळी रोहित शर्माचा छत्रीमधला फोटो चांगलाच वायरल झाला होता.
दुसऱ्या सामन्यापूर्वी पाऊस पडला होता. पण या सामन्यादरम्यान पावसाची शक्यता नसल्याचे म्हटले जात असून खेळाडू आणि चाहत्यांसाठी ही खूषखबर आहे.
पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. या सामन्यात फक्त 13 षटकांचा खेळ झाला. पण या 13 षटकांमध्येच कोहलीला धोनीची आठवण आल्याचे पाहायला मिळाले. धोनी जेव्हा संघात असतो तेव्हा तो युवा खेळाडूंना मार्गदर्शन करत असतो. त्याचबरोबर तो काही निर्णयांमध्ये महत्वाची भूमिकाही बजावत असतो.
पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या चौथ्या षटकात एक गोष्ट घडली आणि कोहलीला धोनीची आठवण आली. हे षटक भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी टाकत होता. या षटकाच्या पाचव्या चेंडूवर वेस्ट इंडिजचा सलामीवीर इव्हिन लुईस चकला आणि चेंडू पॅडवर आदळला. त्यानंतर शमीने जोरदार अपील केली, पण मैदानावरील पंचांनी त्याला नाबाद ठरवले. यावेळी रीव्ह्यू घ्यायचा की नाही, हे कोहलीने यष्टीरक्षक रिषभ पंतला विचारले. पण पंतने यावेळी योग्य निर्णय सांगितला नाही. त्यामुळे कोहलीने रीव्ह्यू न घेण्याचा निर्णय घेतला. काही वेळाने या चेंडूचा रीप्ले दाखवण्यात आला. त्यावेळी हा चेंडू थेट स्टम्पला लागत असल्याचे दिसत होते. त्यामुळे पंतने जर रीव्ह्यू घ्यायला सांगितला असता तर लुईस आऊट झाला असता. त्यावेळी कोहलीला धोनीची आठवण आली असेल. कारण धोनी बहुतांशी वेळा रीव्ह्यू घ्यायचा की नाही, याबाबत योग्य निर्णय घेतो.
क्विन्सपार्कवर भारतीय संघच आहे किंग; 12 वर्षांपासून आहे अपराजितभारत आणि वेस्ट इंडिज यांच्यांमध्ये आज दुसरा सामना क्विन्स पार्क ओव्हल येथे होणार आहे. पण या क्विन्स मैदानावर भारतीय संघच किंग असल्याचे दिसत आहे. कारण गेल्या 12 वर्षांमध्ये भारतीय संघ या मैदानात एकही सामना गमावलेला नाही. त्याचबरोबर भारताने भारताबाहेर सर्वात जास्त धावसंख्या याच मैदानात रचलेली आहे.
भारताने 2007 साली झालेल्या विश्वचषकात भारत आणि बर्म्युडा यांच्यातील सामना या मैदानात झाला होता. बर्म्युडाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले होते. भारताने या संधीचा चांगलाच फायदा उचलला होता. भारताने बर्म्युडाविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 412 धावा केल्या होत्या. या सामन्यात वीरेंद्र सेहवागने 114 धावा केल्या होत्या. त्याचबरोबर सौरव गांगुली, युवराज सिंग आणि सचिन तेंडुलकर यांनी अर्धशतके झळकावली होती.
या मैदानात 23 मार्च 2007 साली भारताला श्रीलंकेडून पराभव पत्करावा लागला होता. हा या मैदानातील भारताचा अखेरचा पराभव होता. कारण यानंतर सात सामने या मैदानात खेळले गेले आणि एकाही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला नाही. त्यामुळे गेल्या बारा वर्षांपासून भारतीय संघ या मैदानावर अपराजित आहे.