भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या दुसऱ्या वन डे सामन्यात मोहम्मद शमीनं विंडीजला लागोपाठ दोन धक्के देत सामना टीम इंडियाच्या बाजूनं झुकवला. या दोन विकेटसह त्यानं न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टला मागे टाकून अव्वल स्थान पटकावले.
रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांचा बोलबाला राहिला. राहुलच्या शतकी खेळीनंतर रोहित नावाचं वादळ विशाखापट्टणममध्ये घोंगावलं. रोहितनं तुफान फटकेबाजी करताना 159 खेळी केली. रोहितची घोडदौड 44 व्या षटकात रोखण्यात विंडीजला यश आलं, परंतु त्यानं तोपर्यंत विक्रमांचा पाऊस पाडला होता. रिषभ पंत आणि श्रेयस अय्यर यांनीही विंडीज गोलंदाजांना धू धू धुतले. त्यांच्या फटकेबाजीनं भारताला मोठी धावसंख्या उभारून दिली. राहुलनंही 102 धावा केल्या. रोहितनं 138 चेंडूंत 17 चौकार व 5 षटकारांसह 159 धावा चोपल्या. रिषभ 16 चेंडूंत 39 धावा करून माघारी परतला. रिषभ आणि अय्यर यांनी 24 चेंडूंतील 73 धावांची भागीदारी केली. अय्यर 32 चेंडूंत 3 चौकार व 4 षटकार मारून 53 धावांत माघारी परतला. भारताना 5 बाद 387 धावा चोपल्या.
भारताचा कर्णधार विराट कोहलीही पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. वन डे क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच दोन्ही संघांचे कर्णधार ' Golden Duck' वर बाद झाले. पण, दोन्ही कर्णधार शून्यावर बाद होण्याची ही 12वी वेळ आहे. या विकेटसह मोहम्मद शमीनं 2019 या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांत अव्वल स्थान पटकावलं. शमीनं 20 सामन्यांत 21.75 च्या सरासरीनं 40 विकेट्स घेतल्या. त्यानं न्यूझीलंडच्या ट्रेंट बोल्टचा ( 38) विक्रम मोडला.