किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : भारतीय संघाने पहिली कसोटी जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. वेस्ट इंडिजविरुद्धची दुसरी कसोटी आजपासून किंगस्टन येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यातही विजय मिळवून आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत अव्वल स्थान कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. पहिल्या कसोटी भारताने 318 धावांनी दणदणीत विजय मिळवत खात्यात 60 गुण जमा केले आहेत. परदेशातील टीम इंडियाचा हा सर्वात मोठा विजय आहे. वेस्ट इंडिजचे महान खेळाडू इयान बिशॉप यांनी गुरुवारी किंगस्टन येथील खेळपट्टीचा फोटो शेअर केला.
अजिंक्य रहाणेने झळकावलेले दहावे शतक व हनुमा विहारीच्या 93 धावांनंतर जसप्रीत बुमराहने अवघ्या 7 धावांत घेतलेल्या 5 बळींमुळे पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताने वेस्ट इंडीजचा 318 धावांनी धुव्वा उडविला. चौथ्या दिवशी विजयासाठी 419 धावांच्या कठीण लक्ष्याचा पाठलाग करताना यजमान दुसऱ्या डावात 100 धावांवर गारद झाला. इशांतने 31 धावांत 3 तर, शमीने 13 धावांत 2 बळी घेत बुमराहला चांगली साथ दिली. एकवेळ विंडीजच्या 9 बाद 50 धावा झाल्या होत्या. त्यानंतर केमार रोच (36) आणि कमिन्स (नाबाद 19) या जोडीने दहाव्या विकेटसाठी 50 धावा जोडत पराभव लांबविला. अखेर इशांतने रोचला बाद करीत भारताच्या विजयावर शिक्का मारला.
पहिल्या कसोटीत दोन्ही संघांच्या जलदगती गोलंदाजांनी वर्चस्व गाजवले होते. त्यामुळे दुसऱ्या कसोटीतही तोच थरार पाहायला मिळेल अशी शक्यता आहे. वेस्ट इंडिजचे महान खेळाडू इयान बिशॉप यांनी गुरुवारी किंगस्टन येथील खेळपट्टीचा फोटो शेअर केला. खेळपट्टीवर गवत दिसत आहे आणि टीम इंडियाच्या चाहत्यांना जसप्रीत बुमराहच्या भेदक मारा पाहण्याची प्रतीक्षा आहे.
संभाव्य संघ :
भारत- विराट कोहली. मयांक अग्रवाल, लोकेश राहुल/रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विराही, रिषभ पंत, रवींद्र जडेजा/आर अश्विन, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह.
वेस्ट इंडिज - जेसन होल्डर, क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शॅमर्ह ब्रुक्स, जॉन कॅम्प्बेल, रोस्टन चेस, रॅहकिम कोर्नवॉल, जॅहमर हॅमिल्टन, शेनॉन गॅब्रिएल, शिमरॉन हेटमायर, शे होप, किमो पॉल, केमार रोच.
Web Title: India vs West Indies, 2nd Test : Ian Bishop shares picture of Sabina Park's green-top pitch
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.