किंगस्टन, भारत विरुद्ध वेस्ट इंडिज : सध्या भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या कसोटी सामन्यात एक पराक्रम पाहायला मिळाला. पण हा पराक्रम पाहण्यासाठी भारताला तब्बल 13 वर्षे वाट पाहावी लागली.
भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये दादा समजला जातो. कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा दबदबा आहे. पण गेल्या 13 वर्षांमध्ये भारताला ही गोष्ट करता आली नव्हती. गेल्या 13 वर्षांमध्ये भारताने कसोटी क्रिकेटमध्ये बरेच विजय मिळवले. मालिकाही जिंकल्या, पण हा पराक्रम करायला तब्बल एका तपापेक्षा जास्त काळ जावा लागला.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने हॅट्रिक मिळवली. वेस्ट इंडिजच्या धर्तीवर हॅट्रिक पटकावणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. पण भारताला कसोटी क्रिकेटमध्ये तब्बल 13 वर्षांनी हॅट्रिक पाहण्याचा योग आला. कारण यापूर्वी इरफान पठाणने कराचीमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 2006 साली हॅट्रिक मिळवली होती. भारताकडून पहिली हॅट्रिक फिरकीपटू हरभजन सिंगने कोलकाता येथे 2001 साली पटकावली होती.
बुम... बुम... बुमरा... वेस्ट इंडिजच्या धर्तीवर रचला इतिहास
दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराने वेस्ट इंडिजच्या धर्तीवर एक इतिहास रचला आहे. वेस्ट इंडिजच्या धर्तीवर असा पराक्रम करणारा बुमरा हा आतापर्यंतचा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे.
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यामध्ये सध्या दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी केली. भारताच्या हनुमा विहारीच्या शतकाच्या जोरावर भारताने 416 धावांपर्यंत मजल मारली. पण या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजची दुसऱ्या दिवसअखेर 7 बाद 87 अशी अवस्था आहे. यावेळी वेस्ट इंडिजचा कर्दनकाळ ठरला तो बुमरा. कारण बुमराने सातपैकी सहा वेस्ट इंडिजच्या फलंदाजांना बाद करण्याची किमया साधली आहे. पण बुमराचा पराक्रम फक्त एवढाच नाही.
बुमराने वेस्ट इंडिजच्या सहा फलंदाजाना बाद करत त्यांचे कंबरडे मोडले. पण बुमराने या सामन्यात हॅट्रीकही साधली आहे. आतापर्यंत तो भारताचा कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारणारा तिसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी भारताकडून हरभजन सिंग आणि इरफान पठाण यांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारली होती.
बुमरा हा वेस्ट इंडिजच्या धर्तीवर कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्रिक साकारणारा पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. कारण हरभजनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि इरफानने पाकिस्तानविरुद्ध हॅट्रिक साकारली होती. पण वेस्ट इंडिजच्या धर्तीवर एकाही भारतीय गोलंदाजांना हॅट्रिक साकारता आली नव्हती. त्यामुळे बुमराने ही वेस्ट इंडिजच्या धर्तीवर हॅट्रक साकारत इतिहास रचला आहे.
Web Title: India vs West Indies, 2nd test: India has to wait 13 years for 'this' feat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.